ठाण्यात डंपरच्या धडकेत दुचाकीवरील व्यावसायिकाचा मृत्यू; घोडबंदर रोडवरील घटना

By जितेंद्र कालेकर | Updated: April 2, 2024 20:08 IST2024-04-02T20:08:04+5:302024-04-02T20:08:19+5:30

पटेल हे काही कामानिमित्त त्यांच्या स्कूरटवरुन घाेडबंदर रोडने मंगळवारी सकाळी जात होते. त्याचवेळी त्यांच्या मागून आलेल्या एका मालवाहू डंपरने त्यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली.

Businessman on two-wheeler dies in collision with dumper in Thane; Incident on Ghodbunder Road | ठाण्यात डंपरच्या धडकेत दुचाकीवरील व्यावसायिकाचा मृत्यू; घोडबंदर रोडवरील घटना

ठाण्यात डंपरच्या धडकेत दुचाकीवरील व्यावसायिकाचा मृत्यू; घोडबंदर रोडवरील घटना

ठाणे: घोडबंदर रोडने ठाण्याच्या दिशेने आपल्या स्कूटरवरुन जाणऱ्या हेमंत पटेल (६६, रा. सुकूर गार्डन, कासारवडवली, ठाणे) या व्यावसायिकाला पाठीमागून आलेल्या डंपरच्या  धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी डंपर चालक रमेश सिंग (४४, रा. खारेगाव, ठाणे. मुळ रा. उत्तरप्रदेश) याला अटक केल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी  दिली.

पटेल हे काही कामानिमित्त त्यांच्या स्कूरटवरुन घाेडबंदर रोडने मंगळवारी सकाळी जात होते. त्याचवेळी त्यांच्या मागून आलेल्या एका मालवाहू डंपरने त्यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली. या अपघातात ते स्कूरटवरुन खाली कोसळले. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागून मोठया प्रमाणात रक्तस्त्रावही झाला. त्यांना वाहतूक शाखा आणि कापूरबावडी पोलिसांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पटेल यांच्या मृत्यूने त्यांच्या सुकूर गार्डन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी कापूरबावडी पाेलिस ठाण्यात डंपर चालक रमेश सिंग यांच्याविरुद्ध माेटार वाहन कायद्याखाली तसेच कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Businessman on two-wheeler dies in collision with dumper in Thane; Incident on Ghodbunder Road