बसमध्ये गोळी झाडणारा अटकेत
By Admin | Updated: April 9, 2017 02:41 IST2017-04-09T02:41:39+5:302017-04-09T02:41:39+5:30
ठाण्यात खरेदी करून घरी परतणाऱ्या एका ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर राज्य परिवहन सेवेच्या (एसटी) बसमध्ये गोळीबार करणाऱ्या बदलापुरातील सुमेध करंदीकर (३३) याला

बसमध्ये गोळी झाडणारा अटकेत
ठाणे : ठाण्यात खरेदी करून घरी परतणाऱ्या एका ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर राज्य परिवहन सेवेच्या (एसटी) बसमध्ये गोळीबार करणाऱ्या बदलापुरातील सुमेध करंदीकर (३३) याला कासारवडवली पोलिसांनी शनिवारी अटक केली. तो सराईत गुन्हेगार असून त्याला १४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जखमी पार्वती ठाकूर (७०) आणि त्यांची सून सुलभा (२८) या दोघी शुक्रवारी ठाण्यात खरेदीसाठी आल्या होता. याचदरम्यान, त्या ठाणे स्थानकातून ठाणे-बोरिवली एसटी बसने बोरिवली येथे घरी जाताना नशेत असलेल्या सुमेधने इतर प्रवाशांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. याचदरम्यान, बस घोडबंदर रोडवरील भार्इंदरपाडा येथे येताच त्याने गावठी कट्टा काढून पार्वती ठाकूर यांच्या दिशेने एक गोळी झाडली. ती त्यांच्या खांद्याला लागली. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याचदरम्यान, बसमधील प्रवाशांनी सुमेधला पकडून चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. त्याने हा कट्टा कुठून आणला, तो कुठे जात होता. त्याचबरोबर त्याने ठाकूर यांच्यावर कोणत्या रागातून गोळीबार केला. तसेच त्याच्याविरोधात आणखी कोणत्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत का, याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास अशोक साळवे करीत आहेत. (प्रतिनिधी)