तिघांसह बस अटेंडंटला कोठडी

By Admin | Updated: December 4, 2015 00:27 IST2015-12-04T00:27:27+5:302015-12-04T00:27:27+5:30

मीरा रोडच्या एका शाळेत ४ थीच्या विद्यार्थिनीच्या केलेल्या लैंगिक शोषणप्रकरणी अटक असलेल्या तिघाही शिक्षकांसह शाळेच्या महिला बस अटेंडंटला ठाणे

The bus to the atticent with the trio | तिघांसह बस अटेंडंटला कोठडी

तिघांसह बस अटेंडंटला कोठडी

मीरा रोड : मीरा रोडच्या एका शाळेत ४ थीच्या विद्यार्थिनीच्या केलेल्या लैंगिक शोषणप्रकरणी अटक असलेल्या तिघाही शिक्षकांसह शाळेच्या महिला बस अटेंडंटला ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या विद्यार्थिनीवर शाळेतच वर्षभरापासून लैंगिक अत्याचार झाल्याचा गुन्हा सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी मीरा रोड पोलीस ठाण्यात दाखल होताच पालघर, वाणगाव व डहाणू भागातून शाळेत पीटी शिकवणाऱ्या ४६ वर्षीय तर चित्रकलेच्या २७ व २३ वर्षीय अशा तिघा शिक्षकांना अटक केली होती.
दोन दिवसांनी शाळेच्या ४९ वर्षीय महिला बस अटेंडंटला अटक केली गेली. चौघाही आरोपींना आधी २८ नोव्हेंबरपर्यंत, नंतर १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवून मिळाली होती. तर, शाळा व्यवस्थापनाने चौघाही आरोपींना सेवेतून निलंबित करून मुख्याध्यापिकेस हटवले आहे. घटनेचे गांभीर्य व पालकांच्या दबावानंतर शाळेने सुरक्षितता आदींसह आवश्यक उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. या प्रकरणी मध्यंतरी पालकांनी शाळेवर मोर्चाही काढला होता. (प्रतिनिधी)

Web Title: The bus to the atticent with the trio