शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात विवाहितेला रॉकेल ओतून पेटवले; सासूसह पतीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 19:46 IST

ठाणे : मुलीला शाळेत प्रवेश घेण्याकरिता तिचे सर्टिफिकेट घेण्यासाठी रघुनाथनगर येथील सासरी आलेल्या विवाहितेला सासूने रॉकेल ओतून पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली असून ती ८० टक्के भाजली आहे. याप्रकरणी सासूसह पतीविरोधात गुन्हा दाखल करून शनिवारी पहाटे त्यांना अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली.ठाण्यातील रघुनाथनगर येथे राहणारी दक्षा मांगे ...

ठळक मुद्दे८० टक्के भाजली, रघुनाथनगर येथील घटनाअंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

ठाणे : मुलीला शाळेत प्रवेश घेण्याकरिता तिचे सर्टिफिकेट घेण्यासाठी रघुनाथनगर येथील सासरी आलेल्या विवाहितेला सासूने रॉकेल ओतून पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली असून ती ८० टक्के भाजली आहे. याप्रकरणी सासूसह पतीविरोधात गुन्हा दाखल करून शनिवारी पहाटे त्यांना अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली.ठाण्यातील रघुनाथनगर येथे राहणारी दक्षा मांगे (३०) असे त्या विवाहितेचे नाव आहे. तिने दिलेल्या तक्रारीत, लग्न झाल्यापासून तिची सासू जमनाबेन मांगे (७१) आणि पती अशोक (४०) हे दोघेही तिला कोणत्याही कारणावरून मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास देत होते. तसेच साधारण दोन ते अडीच महिन्यांपूर्वी त्यांच्यात झालेल्या वादावरून त्या दोघांनी तिला मारहाण केली होती. त्यातून ती घाटकोपरला आईकडे राहण्यासाठी गेली होती. दरम्यान, मुलगी दिशा हिला शाळेत प्रवेश घेण्याकरिता तिचे सर्टिफिकेट घेण्यासाठी शुक्रवारी १३ एप्रिल २०१८ रोजी ५ वाजता पतीच्या घरी रघुनाथनगर वागळे इस्टेट येथे आली होती. त्यावेळी सासू जमनाबेन यांनी विनाकारण भांडण करून बेडरूममध्ये सर्टिफिकेट घेण्यासाठी गेल्यावर हात धरून खेचून स्वयंपाकघरात आणून अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यामध्ये ती ८० टक्के भाजल्याने तिला शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. याप्रकरणी शनिवारी पहाटे गुन्हा दाखल झाल्यानंतर सासू-पती या दोघांना अटक केली आहे. तसेच शनिवारी न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांनी दिली.

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCrimeगुन्हा