वणव्यात तीन घरे जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:42 IST2021-04-01T04:42:11+5:302021-04-01T04:42:11+5:30

खर्डी : खर्डी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बेलपाडा या आदिवासी वस्तीतील तीन घरे वणव्याच्या आगीत जळून खाक झाली. ही घटना बुधवारी ...

Burn down three houses in the forest | वणव्यात तीन घरे जळून खाक

वणव्यात तीन घरे जळून खाक

खर्डी : खर्डी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बेलपाडा या आदिवासी वस्तीतील तीन घरे वणव्याच्या आगीत जळून खाक झाली. ही घटना बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास घडली.

आगीने रौद्ररूप धारण करून हवेमुळे आग पसरल्याची पाहता घरे जळून खाक होताना दिसताच मंडळ अधिकारी संदीप चौधरी, खर्डीचे सरपंच भाग्यश्री डिगे, उपसरपंच प्रणाली खर्डीकर, माजी सरपंच प्रशांत खर्डीकर, प्रकाश जाधव, तलाठी विजय लोहकरे, चंद्रकांत मोंडुळा, कोतवाल राजेश जाधव, दीपक पराड, यशवंत केवारी, रवी डिगे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या घटनेत पंडित मधुकर पांढरे, कार्तिक कुलबहादूर आणि भुऱ्या हिलम यांच्या घरांचे नुकसान झाले. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, उपसरपंच यांनी पुढाकार घेत लागलीच इतर नागरिकांच्या सहकार्याने पीडित कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे केला.

Web Title: Burn down three houses in the forest