शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दफनविधी साहित्याचे दर समाजमाध्यमावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 06:51 IST

मृतांच्या नातेवाइकांची होतेय लूट; विक्रेत्याने लढविली शक्कल

- कुमार बडदे मुंब्रा : मृतदेह दफन करण्यासाठी, तसेच अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी गेलेल्या मृताच्या आप्तस्वकीयांची विक्रेत्यांकडून अनेकदा लूट होते. ती थांबावी, यासाठी एका विक्रेत्याने दफनविधीसाठी लागणाऱ्या साहित्याचे दर चक्क समाजमाध्यमावर व्हायरल केल्यामुळे अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आहेत.मृत व्यक्तीच्या अंतिम विधी (मृतदेह दफन करणे किंवा अंत्यसंस्कार करणे) साठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव करताना मृताचे आप्तस्वकीय तसेच मित्रपरिवाराची धावपळ होते. घरातील एखाद्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले असताना, दु:ख बाजुला सारुन नातलगांना अंत्यविधीच्या साहित्याची जुळवाजुळव करण्यासाठी पायपीट करावी लागते. हे साहित्य खरेदी करण्यासाठी गेलेली व्यक्ती त्यावेळी दराच्या बाबतीत घासाघीस करण्याच्या मन:स्थितीमध्ये नसते. नेमक्या याच संधीचा लाभ घेवून, अंत्यविधीच्या साहित्याची विक्री करणारे काही विक्रेते अवाजवी दर आकारुन लोकांची लूट करतात. विक्रेत्यांकडून पैसे तर जास्त घेतलेच जातात, शिवाय त्यामोबदल्यात साहित्यही चांगल्या दर्जाचे दिले जात नाही. बरेचदा खराब झालेल्या साहित्याची विक्री करताना हे विक्रेते दिसून येतात. अशा अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी मुंब्रा येथील सरफराज दरबारी यांनी शक्कल लढवली. त्यांनी दफनविधी व अंत्यसंस्कारासाठी लागणाºया साहित्य विक्रीचे दर समाजमाध्यमावर व्हायरल केले. सोशल मीडियावर बहुतेक जण सक्रिय असतात. त्यांच्यापर्यंत अंत्यविधीच्या साहित्याचे योग्य दर पोहोचावेत, त्यांची लूट थांबावी, हा उद्देश असल्याचे सरफराज दरबारी यांनी लोकमतला सांगितले.सरफराज यांनी व्हायरल केलेल्या पोस्टनुसार अत्यंत नाममात्र दरात दफनविधीसाठी लागणाºया तीन चटया, गुलाबपाणी, १८ मीटर कापड, कापूस, मृतदेहाला अंघोळ घालण्यासाठी साबण, सुईधागा, अत्तर आदी साहित्य नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंब्रा व परिसरात दफनविधीचे साहित्य विकणाºया काही दुकानांत अवाच्या सव्वा दराने या साहित्याची विक्री होत असल्याने गोरगरीब मुस्लिम कुटुंबांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया