मीरारोडमध्ये १६ लाख ४० हजारांची घरफोडी; नयानगर पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल
By धीरज परब | Updated: October 19, 2023 17:13 IST2023-10-19T17:13:36+5:302023-10-19T17:13:43+5:30
लॉकरमधील ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम आणि ४ लाख ९० हजारांचे सोन्याचे दागिने चोरी प्रकरणी नया नगर पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.

मीरारोडमध्ये १६ लाख ४० हजारांची घरफोडी; नयानगर पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल
मीरारोड - मीरारोडच्या नया नगर भागात एका व्यापाऱ्याचे घर फोडून १६ लाख ४० हजारांचा ऐवज चोरण्यात आला. नया नगर , मासा रोड वरील कमर अपार्टमेंट मध्ये मोहम्मद कलीम मोहम्मद युसूफ शेख ( ३० ) हे कपडा व्यापारी राहतात . १७ रोजी दुपारी २ वाजता ते बाहेर गेले व १८ रोजी मध्यरात्री १ च्या सुमारास घरी परतले असता घराच्या दाराचा कडी कोयंडा तोडण्यात आला होता. घरात पहिले असता लोखंडी कपाटातील लॉकरचे हॅन्डल तोडून लॉकरमधील ऐवज चोरीला गेला होता.
लॉकरमधील ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम आणि ४ लाख ९० हजारांचे सोन्याचे दागिने चोरी प्रकरणी नया नगर पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. घरफोडीचे गांभीर्य पाहता उपायुक्त जयंत बजबळे , सहायक आयुक्त उमेश माने - पाटील , वरिष्ठ निरीक्षक विलास सुपे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत आढावा घेतला . त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरिभाऊ भोसले तपास करत आहेत.