गजबजलेल्या एरंजाड गावात घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:44 IST2021-09-26T04:44:13+5:302021-09-26T04:44:13+5:30
बदलापूर : बंद फ्लॅटमध्ये चोरीच्या घटना वाढत असताना आता एरंजाडसारख्या गजबजलेल्या गावांतही घरफोडीची घटना घडली आहे. या घरफाेडीत तब्बल ...

गजबजलेल्या एरंजाड गावात घरफोडी
बदलापूर : बंद फ्लॅटमध्ये चोरीच्या घटना वाढत असताना आता एरंजाडसारख्या गजबजलेल्या गावांतही घरफोडीची घटना घडली आहे. या घरफाेडीत तब्बल सहा लाखांंचा मुद्देमाल चाेरीला गेला असून, यामध्ये २५ ताेळे साेन्याचा ऐवज आहे. या घटनेमुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. दरम्यान, पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.
मेहेर हे काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांसोबत बाहेरगावी गेले हाेते. बुधवारी मध्यरात्री २ ते ३ च्या सुमारास ही घटना घडली. चोरट्यांनी दीपक यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि तिजोरी तोडून तब्बल सहा लाख ३५ रुपयांचा ऐवज चोरून नेला. बदलापूर शहरात काही दिवसांपासून वारंवार घडत असलेल्या चाेरीच्या घटनांमुळे पोलिसांनी रात्री शहरी आणि ग्रामीण भागात गस्त वाढविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
-------------