दहिसर येथे लुटमार करणाऱ्या बंटी आणि बबलीला अटक

By Admin | Updated: May 6, 2014 00:51 IST2014-05-04T23:54:11+5:302014-05-06T00:51:32+5:30

दहिसर येथे लुटमार करणाऱ्या बंटी आणि बबलीला अटक

Bunty and Babali arrested in Dahisar arrest | दहिसर येथे लुटमार करणाऱ्या बंटी आणि बबलीला अटक

दहिसर येथे लुटमार करणाऱ्या बंटी आणि बबलीला अटक

दहिसर येथे लुटमार करणाऱ्या बंटी आणि बबलीला अटक
मुंबई: दिवसाढवळ्या रिक्शातून पादचाऱ्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावत पोबारा करणार्‍या बंटी बबलीला एमएचबी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. उमा छत्री ऊर्फ गुडीया व उध्दव जाधव अशी या दोघांची नावे आहेत.
दहिसर येथे राहणारे या दोघांनी मुंबई पोलिसांची झोप उडविली होती. हे दोघे आरोपी बंटी बबली स्टाईलने चोर्‍या करीत. उद्धव हा रिक्शा चालवायचा आणि गुडिया त्याच रिक्शात मागे बसायची. रस्त्यावरुन जाणार्‍या महिलेच्या गळ्यात सोनसाखळी दिसली की उद्धव त्या महिलेजवळ रिक्शा थांबवायचा. रिक्शा थांबताच गुडीया पापणी लवते न लवते तेच सोनसाखळी हिसकवायची आणि दोघे पळ काढायचे. या दोघांनी काही दिवसांपूर्वी बोरिवलीत एका महिलेची पर्स चोरी केली होती. त्या महिलेने बोरिवली पोलीसांत तक्रार नोंदवून त्यांच्या रिक्शाचा क्रमांक पोलिसांना दिला होता.
पोलीस या दोघांचा शोध घेत असताना हे दोघे आरोपी दहिसर चेकनाका येथे येणार असल्याची माहिती मिळताच सापळा रचून एमएचबी पोलिसांनी दोेघांना अटक केली. त्यांची रिक्शाही ताब्यात घेण्यात आली आहे. या दोघांनी लुटमारीचे किती गुन्हे केले याचा पोलीस तपास करत आहे. या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक तुकाराम राठोड यांनी दिली.

Web Title: Bunty and Babali arrested in Dahisar arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.