शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

डोंबिवलीत भाजपाच्या आधारकार्ड शिबिराला उदंड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 5:02 PM

डोंबिवली: आधारकार्ड साठी ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यातच शहरातील दोन बँकांव्यतिरीक्त कुठेही आधारकार्ड केंद्र नाही त्याची दखल घेत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेनूसार पंडीत दीनदयाळ उपाध्याय कल्याणकारी संस्था व भारतीय जनता पार्टी डोंबिवली पश्चिम मंडल यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष आधार कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन १० ते १२ जानेवारी ...

ठळक मुद्देतीन दिवस चालणार शिबिर प्रज्ञेश प्रभुघाटे यांनी केले आयोजन

डोंबिवली: आधारकार्ड साठी ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यातच शहरातील दोन बँकांव्यतिरीक्त कुठेही आधारकार्ड केंद्र नाही त्याची दखल घेत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेनूसार पंडीत दीनदयाळ उपाध्याय कल्याणकारी संस्था व भारतीय जनता पार्टी डोंबिवली पश्चिम मंडल यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष आधार कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन १० ते १२ जानेवारी या तीन दिवसांच्या कालावधीत सुरु झाले. त्याचा शुभारंभ बुधवारी राज्यमंत्री चव्हाण यांनी केला.सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत वेळेत एव्हरेस्ट हॉल, म. गांधी मार्ग डोंबिवली पश्चिम येथे ही सुविधा उपलब्ध असणार असल्याची माहिती शिबिराचे आयोजक भाजपाचे पश्चिम मंडल अध्यक्ष प्रज्ञेश प्रभुघाटे यांनी दिली. आधार कार्ड नोंदणीसाठी, नवीन नोंदणी/दुरु स्ती असे विविध सुविधा तेथे उपलब्ध असतील.मात्र त्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांच्या सुविधेसाठी ५ यंत्र ठेवण्यात येणार असून एकाचवेळी १५० नागरिकांची सोय होणार असल्याचे प्रभुघाटे म्हणाले. पूर्व नोंदणीसाठी नागरिकांनी बाळकृष्ण अपार्टमेंट, सी विंग, पिहला मजला, घन:श्याम गुप्ते मार्ग, डोंबिवली (पश्चिम) असे आवाहन त्यांनी केले.नागरिकांचा गोंधळ होऊ नये यासाठी स्वतंत्र विविध रंगांचे बॅजेस नोंदणी केलेल्या नागरिकांना देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रथम येणा-याला प्राधान्यक्रम देण्यात येणार असल्याने शहरासह पंचक्रोशीतील कोणीही नागरिक येवो त्यांची गैरसोय होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. बुधवारी कोणताही गोंधळ न होता सुटसुटीत पद्धतीने उपक्रम यशस्वी झाल्याची माहिती प्रभुघाटे यांनी दिली. त्यावेळी भाजपाचे पूर्व मंडल अध्यक्ष संजीव बीडवाडकर, ज्येष्ठ नेते जूने डोंबिवलीकर पद्माकर कुलकर्णी, पूर्व मंडलाचे सरचिटणीस सुरेश पुराणिक आदींसह मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkalyanकल्याण