दमदाटी आणि शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:24 IST2021-07-22T04:24:49+5:302021-07-22T04:24:49+5:30
------------------- क्षुल्लक कारणावरून मारहाण कल्याण : पूर्वेतील सूचकनाका परिसरातील सम्यक शाळेसमोरील जुन्या पाण्याच्या टाकीजवळून रविवारी सायंकाळी ७.३० वाजता इमाम ...

दमदाटी आणि शिवीगाळ
-------------------
क्षुल्लक कारणावरून मारहाण
कल्याण : पूर्वेतील सूचकनाका परिसरातील सम्यक शाळेसमोरील जुन्या पाण्याच्या टाकीजवळून रविवारी सायंकाळी ७.३० वाजता इमाम शेख हे रिक्षा घेऊन घरी जात होते. त्या वेळी त्यांच्या रिक्षासमोर इब्राहीम शेख उर्फ झिंगा याने छत्री उघडली. त्यामुळे इमाम यांना समोरचे दिसायला अडचण निर्माण झाली. इब्राहीमला त्यांनी छत्री बंद करण्यास सांगितले असता त्याला राग आला. यात त्याने इमाम यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. ही मारहाण करताना ईस्माईल शेख (१२) यालाही मार लागला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------------
पथदिवे बंद
डोंबिवली : ठाकुर्लीतील ९० फुटी रोडवर नुकतेच स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नवीन पथदिवे बसविले आहेत. परंतु, खंबाळपाडा बाजूकडील दिवे गेल्या दोन दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे मुसळधार पडणाऱ्या पावसात अंधारातून वाट काढत येथून वाहनचालकांना मार्गस्थ व्हावे लागत आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.
--------