शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

बुलेट ट्रेनच्या कामात पालिकेची आरक्षणेही होणार बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 00:11 IST

बुलेट ट्रेनच्या मुद्यावरुन राज्य पातळीवर शिवसेनेने आपला विरोध कायम ठेवला असला तरी, ठाणे महापालिका प्रशासनाने या ट्रेनसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन काही महिन्यांपूर्वीच दिले होते.

ठाणे : बुलेट ट्रेनच्या मुद्यावरुन राज्य पातळीवर शिवसेनेने आपला विरोध कायम ठेवला असला तरी, ठाणे महापालिका प्रशासनाने या ट्रेनसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन काही महिन्यांपूर्वीच दिले होते. आता या बुलेट ट्रेनसाठी १९.४९ हेक्टर जमीनीचे भूसंपादन आणि म्हातार्डी येथे स्थानकासाठी १७.१३ हेक्टर जमीनीचे भूसंपादन केले जाणार आहे. यामध्ये ठाणे महापालिकेची ट्रिटमेंट प्लॅन्ट, पम्पिंग स्टेशन महापालिकेची हौसिंगची योजना, महाविद्यालय, पोलीस स्टेशन प्रायमरी शाळा, हॉस्पिटल अशी विकास आराखड्यातील विविध आरक्षणे बाधित होणार आहे. त्यानुसार या आरक्षणांच्या फेरबदलाचा महत्वाचा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहे. या प्रस्तावावर सत्ताधाऱ्यांसह राष्टÑवादी काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.बुलेट ट्रेन ही ठाणे महापालिका हद्दीतील शिळ, डावले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावातून जाणार आहे. त्यानुसार येथील जागा संपादीत करण्याबाबत यापूर्वी आदेश झालेले आहेत. या जागेच्या मोबदल्यात टीडीआर देण्याचेही निश्चित झाले आहे. त्यानुसार मंजुर नकाशात ठाणे महापालिका हद्दीतील आखणीची लांबी ही १११३५. ०० मीटर एवढी आहे. तर रुंदी १७.५० मीटर धरण्यात आली आहे. त्यानुसार १९.४९ हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. म्हातार्डी येथेही स्थानक उभारले जाणार असल्याने त्यासाठी १७.१३ हेक्टर जमीनीचे भूसंपादन केले जाणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेची येथील विविध आरक्षणे बाधित होणार आहेत.यामध्ये काही आरक्षणांना जास्त तर काही आरक्षणांना कमी प्रमाणात फटका बसणार आहे. त्याअनुषंगाने आता येथील आरक्षणाचा फेरबदलचा प्रस्ताव येत्या महासभेत महापालिकेच्या वतीने मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार सेक्टर १० मधील प्रपोज्ड लोकोशेड -२ चे आरक्षणाचे क्षेत्र हे १५.०० हेक्टर असून त्यातील ४.०६ टक्के आरक्षण बाधित होणार असून, १०.९४ हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे. महापालिका प्रायमरी स्कूलचे ०.६० हेक्टर क्षेत्रापैकी ०.००७२ हेक्टर क्षेत्र बाधित होणार असून ०.५१ हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे. रिक्रिएशन ग्राऊंडचे १.१९ हेक्टर क्षेत्रापैकी ०.४१ हेक्टर क्षेत्र बाधित होणार असून ०.७८ हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे.बस स्टँड, प्रभाग कार्यालय आणि हॉस्पीटलच्या अनुक्रमे ०.२८, २.४० आणि २.४० हेक्टर क्षेत्रापैकी ०.०५, ०.३० आणि ०.०३ हेक्टर क्षेत्र बाधित होणार असून ०.२०, २.१० आणि २.३७ हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे.दुसरीकडे सेक्टर ११ मधील प्रस्तावित सिव्हरेज ट्रिटमेंट प्लॅन्ट, पम्पिंग स्टेशनचे ०.५० हेक्टरच्या आरक्षणापैकी ०.११ हेक्टर क्षेत्र बाधित होणार असून ०.३९ हेक्टर आरक्षण शिल्लक राहणार आहे. म्युनिसिपल हाऊसिंगचे ४.२५ हेक्टर क्षेत्रापैकी ०.१५ हेक्टर क्षेत्र बाधित होणार असून ४.१० हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे.महाविद्यालयाचे १.८१ हेक्टर क्षेत्रापैकी ०.३१ हेक्टर बाधित होणार असून १.५० हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे. प्रस्तावित क्रिमेटोरीयमचे १.०८ हेक्टर आरक्षणापैकी ०.६ हेक्टर बाधित होणार असून १.०२ हेक्टर शिल्लक राहणार आहे. म्युनिसिपल पर्पजसाठी ०.७३ हेक्टर क्षेत्रापैकी ०.५१ हेक्टर क्षेत्र बाधित होणार असून पोलीस स्टेशनच्या ०.३९ हेक्टर क्षेत्रापैकी ०.०६ हेक्टर क्षेत्र बाधित होणार असून ०.३३ हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे.यापूर्वी सत्तेत असलेल्या शिवसेनेने राज्य पातळीवर याला आधीच विरोध केला आहे. राष्टÑवादीनेसुध्दा विरोध केला असून मनसेने तर येथील जमीन सर्व्हेसुध्दा थांबविला होता. आता तर पालिकेची आरक्षणेसुध्दा यामध्ये बाधित होणार असल्याने या राजकीय मंडळीची भूमिका काय असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनthaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका