शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

मुंबई-नाशिक -नागपूर मार्गावर धावणार बुलेट ट्रेन; देशात आणखी सात मार्गांवर बुलेट ट्रेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 06:58 IST

डीपीआरसाठी सल्लागार नेमणार

- नारायण जाधव ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची भूसंपादनासह कोरोनामुळे रखडपट्टी सुरू असतानाच आता (एनएचएसआरसीएल) नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने देशात सात मार्गांवर नव्या बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेऊन त्यांचा डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी नुकत्याच निविदा मागविल्या आहेत. यातील दोन मार्ग हे मुंबईवरून धावणार आहेत. यात ७११ किमीच्या मुंबई-हैदराबाद आणि ७४१ किमीच्या मुंबई-नाशिक-नागपूर मार्गाचा समावेश असल्याचे नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या सूत्रांनी सांगितले.

मुंबई-नाशिक-नागपूर हा मार्ग सध्या ७४१ किमीचा प्रस्तावित असून, त्याचे अंतर कमी-जास्त होऊ शकते. सध्या त्याचा सविस्तर प्रकल्प तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया मंगळवारी कॉर्पोरेशनने सुरू केली आहे. या डीपीआरमध्ये मुंबई-नाशिक-नागपूर हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर या प्रस्तावित मार्गाचे सर्वेक्षण, मार्गादरम्यान असलेल्या ओव्हरहेड, अंडरग्राउंड युटिलिटीज् आणि प्रस्तावित मार्गावर वीज उपकेंद्रे उभारण्यासाठी योग्य जागांच्या पर्यायांची चाचपणी करण्यात येणार आहे. याशिवाय मार्गात किती जमीन लागणार, वनजमीन किती असणार, किती लोक बाधित होणार, त्यासाठी अंदाजे किती खर्च येणार हे पाहिले जाणार आहे.

समृद्धी महामार्गास समांतर हवी बुलेट ट्रेन

च्सूत्रांच्या म्हणण्यानुसार, बुलेट ट्रेन मुंबई-नाशिक-नागपूर समृद्धी महामार्गास समांतर असावी, अशी महाराष्ट्र सरकारची इच्छा आहे. समृद्धीसाठी राज्य सरकारने आधीच जमीन संपादित केली असून, भूसंपादनाचा मोठा अडथळा दूर होऊन एनएचएसआरसीएलची मोठी डोकेदुखी दूर होणार आहे.

च्मुंबई-अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन प्रस्तावित केल्यानंतर मोदी सरकारवर विरोधकांनी मोठ्या प्रमाणात टीका करून देशातील इतर मार्गांवरही बुलेट ट्रेन सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने नव्या सात मार्गांवर बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र