शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेन : प्रशासनापुढे सेनेचे लोटांगण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 23:18 IST

फायदा दिसला की शिवसेना भूमिका बदलते; विरोधकांची कठोर टीका

ठाणे : बुलेट ट्रेनच्या मुद्यावरून राज्यपातळीवर जरी शिवसेनेने आपला विरोध कायम ठेवला असला, तरी स्थानिक शिवसेना नेत्यांनी पक्षश्रेष्ठी देतील तो आदेश पाळू, असे सांगत ठाणे महापालिका प्रशासनाने या ट्रेनसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या घेतलेल्या भूमिकेला ठोस विरोध न करता नांगी टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.दुसरीकडे भाजपावगळता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेने बुलेट ट्रेनला असलेला विरोध यापुढेही कायम असेल, असे स्पष्ट केले आहे. यामुळे प्रशासनापुढच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांपासून ठाण्यात बुलेट ट्रेनचा विषय चांगलाच तापला असून मनसे आणि राष्ट्रवादीने या ट्रेनला विरोध दर्शवला आहे. तसेच शिवसेनेनेसुद्धा तिला विरोध असेल, अशी भूमिका घेतली होती. परंतु, शुक्रवारी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुलेट ट्रेनला सर्वतोपरी सहकार्य करण्याचेच नव्हे तर तिच्यासाठी विकास आराखड्यात आवश्यक ते बदल करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता शिवसेना याबाबत काय भूमिका घेणार, यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु, नेहमीप्रमाणे ठाण्यातील स्थानिक नेत्यांनी प्रशासनापुढे नांगी टाकून गुडघे टेकल्याची अनेक उदाहरणे असल्याने आता बुलेट ट्रेनला त्यांचा विरोधही मावळेल, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.हे लक्षात घेऊन शिवसेना वारंवार आपली भूमिका बदलत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यांचा फायदा होणार असेल, तर या बुलेट ट्रेनचे स्वागतसुद्धा करतील, अशी टीका काँग्रेस, राष्टÑवादी आणि मनसेने केली आहे. याबाबत संपर्क साधला असता प्रशासनाने बुलेट ट्रेनला सहकार्य करण्याचे जाहीर केल्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे. एकीकडे राज्यपातळीवर विरोध असताना दुसरीकडे प्रशासनानेच या ट्रेनला सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याने काय करावे, असा पेच त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. त्यामुळेच, आता श्रेष्ठींच्या आदेशाचे कारण पुढे करून त्यांनी बुलेट ट्रेनविरोधात कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यास नकार दिला आहे.पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील, त्यानुसार बुलेट ट्रेनला विरोध करायचा की नाही, ते ठरवू- नरेश म्हस्के, सभागृह नेते, शिवसेनासहकार्याची भूमिका घेतली असेल, तर आयुक्तांना मनसेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. शिवसेना ही डबल ढोलकी आहे. सेटलमेंट होते, तिथे मत बदलणारी ही पार्टी आहे. - अविनाश जाधव,जिल्हाध्यक्ष, मनसेकेंद्राच्या किंवा राज्याच्या प्रत्येक प्रकल्पासाठी सहकार्य करण्याते काम आयुक्तांनी केले आहे. शिवसेनेची भूमिका चुकीची असून विरोध करायचा आणि आपली पोळी भाजून घ्यायची, अशीच त्यांची अवस्था झाली आहे.- मिलिंद पाटणकर, गटनेते, भाजपापालिका प्रशासनच नव्हे तर सर्व अधिकारी हे संघाच्या शाखेत जाऊन आल्यासारखे वाटत आहेत. आमचा सुरुवातीलाही या ट्रेनला विरोध होता. यापुढेही तो कायम राहणार आहे. शिवसेनेची भूमिका मात्र बुलेट ट्रेनच्या स्थानकांसारखीच झाली आहे. स्थानक बदलले की, त्यांची भूमिकासुद्धा बदलते.- जितेंद्र आव्हाड, आमदार

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनthaneठाणेShiv SenaशिवसेनाMNSमनसेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी