शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

बिल्डर धडकणार केडीएमसीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 03:25 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बिल्डरांना ‘ओपन लॅण्ड टॅक्स’ हा अन्य महापालिकांच्या तुलनेत अत्यंत जास्त प्रमाणात द्यावा लागतो.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बिल्डरांना ‘ओपन लॅण्ड टॅक्स’ हा अन्य महापालिकांच्या तुलनेत अत्यंत जास्त प्रमाणात द्यावा लागतो. त्याच्या वसुलीसाठी महापालिका जाचक पावलेही वारंवार उचलते. त्यामुळे ओपन लॅण्ड टॅक्स कमी करण्याच्या मागणीसाठी ‘एमसीएचआय’ या बिल्डरांच्या संघटनेतर्फे १२ जानेवारीला महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.‘ओपन लॅण्ड टॅक्स’च्या विषयावर बुधवारी सायंकाळी एमसीएचआयच्या पदाधिकाºयांची एक बैठक झाली. त्यात संघटनेच्या पदाधिकाºयांनी एकमुखाने हा निर्णय घेतला आहे. याप्रसंगी एमसीएचआयचे अध्यक्ष मनोज राय, श्रीकांत शितोळे, रवी पाटील, प्रफुल्ल शहा, दीपक मेहता, विकास वीरकर, मिलिंद कुलकर्णी, अनिल भटिजा हे पदाधिकारी आणि संघटनेचे १५० बिल्डर उपस्थित होते.‘ओपन लॅण्ड टॅक्स’ हा ठाणे महापालिकेत एका मीटरसाठी ६० रुपये इतक्या दराने वसूल केला जातो. तोच कर कल्याण-डोंबिवली महापालिका एक मीटरसाठी १,४०० रुपये दराने वसूल करत आहे. ठाणे महापालिकेत तो आठ टक्के आहे, तर कल्याण-डोंबिवली महापालिकेत या कराची वसुली १०० टक्के केली जात आहे. राज्य सरकारकडून सगळ्या गोष्टी सामायिक आणल्या जात आहे. एमएमआर रिजनसाठी सामायिक विकास नियंत्रण नियमावली तयार करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकारने ‘एक राष्ट्र एक कर प्रणाली’ असे घोषवाक्य देत जीएसटी लागू केला. कल्याण-डोंबिवली महापालिका त्याचे अनुकरण का करत नाही, असा सवाल बिल्डरांनी केला आहे.‘ओपन लॅण्ड टॅक्स’प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन वेळा बैठक झाली होती. त्या वेळी त्यांनी यात लक्ष घालून हा टॅक्स कमी करण्याचे आयुक्तांना सूचित केले होते. त्याचपाठोपाठ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही एप्रिल २०१७ मध्येच महापालिकेतील पदाधिकाºयांना टॅक्स कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, पालकमंत्री व मुख़्यमंत्री यांच्या आदेशाला महापालिकेच्या प्रशासनाने व आयुक्तांनी केराची टोपली दाखवली असल्याचे बिल्डर संघटनेचे म्हणणे आहे.टॅक्स कमी करण्याचा ठराव महासभेत मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. कोणतीही फाइल व निर्णय हा तातडीने घेणे, हेच या गतिमान सरकारचे म्हणणे आहे. त्याला महापालिकेचे आयुक्त व प्रशासन अपवाद ठरत आहे, अशी टीका बिल्डरांनी केला आहे. बिल्डरांकडून ४८० कोटी रुपयांची चालू व थकबाकीची वसुली येणे बाकी असल्याची माहिती महापालिकेकडून दिली जाते. प्रत्यक्षात ‘ओपन लॅण्ड टॅक्स’ची चालू व थकबाकीची रक्कम १०० कोटींपेक्षा जास्त नाही. अनेक बिल्डर या वसुलीप्रकरणी न्यायालयात गेले आहे. महापालिकेने निर्णय घेण्यास दिरंगाई केल्याने वसुलीचा प्रश्न कायम आहे.>बेकायदा बांधकामे करणारे मोकाट२७ गावांमध्ये ८० हजार बेकायदा बांधकामे झाली आहेत. आरक्षित जागेवर चार ते सात मजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र, बेकायदा बांधकामे करणाºया बिल्डरांविरोधात महापालिकेने कोणतीच कारवाई केलेली नाही. एक छदामही त्यांच्याकडून वसूल केला जात नाही. सरकारच्या महसूल खात्याला त्यांनी चुना लावला आहे. बेकायदा बांधकामे करून महापालिका हद्दीतील काही प्रकल्पांसाठी निधी खर्च करणाºया अधिकृत बिल्डरांकडून जास्तीचा कर आकारून त्यांच्या व्यवसायाला बाधा आणली जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या सगळ्याच्या निषेधार्थ १२ जानेवारीला मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात मोठ्या संख्येने बिल्डर सहभागी होणार आहेत, असा दावा संघटनेने केला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका