शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या आदेशानंतर ३८ कोटींच्या धनादेश प्रकरणी अखेर बिल्डरला अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: November 10, 2022 22:52 IST

गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई: पोलीस आयुक्तांना दिले होते आदेश

जितेंद्र कालेकर

ठाणे: तब्बल ३८ कोटी ४५ लाखांचे धनादेश न वटल्याप्रकरणी (बाऊन्स केल्याने) ठाण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक अनिल कुरसिजा (साहिल रियलेटर्सचे मालक) यांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने गुरुवारी अटक केली. त्यांना विना जामीन अटक करण्याचे आदेशच ठाणे न्यायालयाने काढून पोलीस आयुक्त जयतित सिंग यांना याप्रकरणी तातडीने कारवाईचे आदेश दिले होते.     

याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने अनिल कुरसिजा यांना धनादेश न वटल्याप्रकरणात १० नोव्हेंबर रोजी अटक केली. नौपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील पाचपाखाडी येथे कुरसिजा वास्तव्याला असून त्यांच्याविरुद्ध धनादेश न वटल्याप्रकरणी कलम १३८ नुसार गुन्हा दाखल झाला होता. वारंवार समन्स बजावूनही कथित आरोपी हजर होत नसल्याने त्यांना या प्रकरणात एक वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच ३८ कोटी ४५ लाखांची रक्कमही भरण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. आपले पती धार्मिक कारणासाठी मध्यप्रदेशात गेल्याचे त्यांच्या पत्नीकडून नौपाडा पोलिसांना सांगण्यात आले होते. त्यानंतर आरोपीला विना जामीन अटक करण्याचे आदेश ठाण्याचे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश जे. आर. मुलानी यांनी १८ आॅक्टोंबर २०२२ रोजी काढले होते. 

नौपाडा पोलिसांवर नाराजी व्यक्त करीत चांगल्या विश्वासू पोलीस अधिकाºयामार्फतीने विना जामीन अटक करण्याचे  समन्स बजावण्याचे आदेश न्यायालयाने पोलीस आयुक्तांना दिले. याच पार्श्वभूमीवर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्याकडे हे प्रकरण पोलीस आयुक्तांनी सोपविले. घोडके यांनी गुरुवारी आरोपी बिल्डर कुरसिजा यांना या प्रकरणात अटक केली. त्यांना ही शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली. एका नामांकित बिल्डरला इतक्या तडकाफडकी अटक झाल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस