हप्त्यासाठी बांधकाम व्यवसायिकावर हल्ला
By Admin | Updated: September 8, 2015 23:29 IST2015-09-08T23:29:32+5:302015-09-08T23:29:32+5:30
मुलीला फिरायला घेऊन येणाऱ्याला हटकले म्हणून त्याच्या मित्राने रविवारी रात्री दोघांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी रात्री एका बांधकाम व्यवसायिकाने

हप्त्यासाठी बांधकाम व्यवसायिकावर हल्ला
मुंब्रा : मुलीला फिरायला घेऊन येणाऱ्याला हटकले म्हणून त्याच्या मित्राने रविवारी रात्री दोघांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी रात्री एका बांधकाम व्यवसायिकाने हप्ता दिला नाही, म्हणून त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. २४ तासादरम्यान झालेल्या या दोन घटनांमुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत.
येथील रेल्वे स्थानकासमोरील परिसरात रहाणारे बांधकाम व्यवसायिक रात्री १२ वाजण्याच्या सुमारास दत्तवाडी परिसरातील त्याच्या बकऱ्यांना चारा देण्यसाठी गेले होते. तेंव्हा तेथे पोहचलेल्या सोहेल उर्फ चाबा आणि फरहान याने त्याच्याकडे २० हजार रु पायांच्या हप्ता मागितला. तो देण्यस त्याने नकार दिला म्हणून दोघांनी व्यवसायिकास प्रथम ठोशा-बुक्क्यांनी मारहाण केली. तर चाबा याने त्याच्या कडील धारदार शस्त्राने जीवे मारण्यचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे.