संवादाचे पूल बांधू या! प्रबोधन पुरस्कार वितरण कार्यक्रमात मान्यवरांची अपेक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 03:13 PM2019-05-26T15:13:52+5:302019-05-26T15:15:28+5:30

प्रबोधन पुरस्कार वितरण कार्यक्रमात संवादाचे पूल बांधू या! अशी अपेक्षा मान्यवरांनी केली.

Build a bridge of communication! Winners of Prabodhan Award Distribution Program! | संवादाचे पूल बांधू या! प्रबोधन पुरस्कार वितरण कार्यक्रमात मान्यवरांची अपेक्षा!

संवादाचे पूल बांधू या! प्रबोधन पुरस्कार वितरण कार्यक्रमात मान्यवरांची अपेक्षा!

Next
ठळक मुद्देसंवादाचे पूल बांधू या! मान्यवरांची अपेक्षा!"केल्याने भाषांतर" या त्रैमासिकाला प्रबोधन पुरस्कारभाषांतर ही भाषेची तोड मोड नाही तर एक संस्कृतीला दुसऱ्या संस्कृतीशी जोडण्याची कला - रामदास भटकळ

ठाणे : वी नीड यू सोसायटी या ठाणे व नवी मुंबईत शैक्षणिक व सामाजिक काम करणाऱ्या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या 'प्रबोधन पुरस्कार' वितरण कार्यक्रम ठाणे कॉलेजच्या थोरले बाजीराव पेशवे सभागृहात झाला. संस्थे तर्फे गेली वीस वर्षे परदेशी भाषांतील साहित्य मराठीत भाषांतरीत करून पाश्चिमात्य साहित्य व संस्कृतीचा परिचय करून देणाऱ्या "केल्याने भाषांतर" या त्रैमासिकाला देण्यात आला. 

             या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ हे होते. प्रबोधन पुरस्कार हा एक लाख रुपये व मानचिन्ह असा असून तो रामदास भटकळ यांनी संपादिका सुनंदा महाजन व अनघा भट यांना दिला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सुनंदा महाजन व अनघा भट यांनी हा भाषांतराचा घाट मराठी समाज अधिक समृद्ध होण्यासाठी दिवंगत विद्यासागर महाजन यांनी सुरू केला. गेली वीस वर्षे तो अथकपणे सुरू आहे. छोट्या नियतकालिकांना ज्या अडचणींना सामोरे जावे त्या सर्व अडचणी आम्हालाही आहेतच. पण याचे जे नियमित वाचक आहेत त्यांचा कायम पाठिंबा व सूचना तसेच सकारात्मक अभिप्राय ही आमची ताकद वाढवणाऱ्या आहेत. असे संवादाचे पूल बांधणे व ते मजबूत करणे याची गरज सार्वत्रिक आहे. भाषांतरात अनेक वेळा मराठीपण हवे असे सांगितले गेले पण ज्या परदेशी भाषा व संस्कृतीची पृष्टभुमी त्या कथेला आहे, तीचा परिचय मराठी समाजास होणे हे जास्त महत्वाचे आम्ही मानतो. या करता भाषेची तोडमोडही करावी लागते पण ती गरजेची असते. असे पुरस्कार मिळणे हे आमची उमेद वाढवणारे आहेच, त्या निमित्ताने आमचाही परीघ वाढतो ते ही गरजेचे आहे. संस्थेच्या लोगो नुसार एकमेकांच्या हातात हात घालून हा प्रवास अधिक वृद्धिंगत होईल अशी आशा आहे.

           ज्येष्ठ प्रकाशक व लेखक रामदास भटकळ यांनी सुरवातीलाच मी केवळ शुभेच्छा देण्यासाठी आलो नसून आभार व्यक्त करायला आलो आहे. केल्याने भाषांतर व वी नीड यू या दोन्ही संस्था जे काम करत आहेत ते अत्यंत महत्वाचे व दूरगामी परिणाम करणारे आहे. अनुवाद हे कार्य केवळ तुम्हाला अन्य भाषा येतात म्हणून करता येणारे शास्त्र नाही. त्याच्या करता आंतरिक इच्छा व ओढ लागते. नेमका आशय समजावा लागतो. त्यामुळे केलेल्या भाषांतराची स्क्रूटिनी महत्वाची असते. यामुळे चुकीचे भाषांतर होत नाही किंवा ते सुधारणे शक्य होते. उदा. गिरीश कर्नाड यांच्या एका पुस्तकाचे भाषांतर करताना कॅटरॅक्ट या शब्दाचे भाषांतर मोतीबिंदू केले पण आशयानुसार ते 'धबधबा' असायला हवे होते. ही काळजी घेणे जरुरीचे आहे.  भाषांतर ही भाषेची तोड मोड नाही तर एक संस्कृतीला दुसऱ्या संस्कृतीशी जोडण्याची कला आहे. म्हणून एका अर्थाने ते वाढवणे आहे, हे आपण समजून घ्यावे. देश स्वतंत्र झाल्यावर सर्व विद्यापीठे, प्राध्यापक, लेखक यांनी भाषांतराचे कार्य सुरू केले असते तर आजचा भारत वेगळा असता. आपल्याकडे साने गुरुजींनी अनेक उत्तम ग्रंथ व साहित्याचा सहज सोपा अनुवाद केला आहे. यावर किमान तीन ते चार पिढ्या समृद्ध झल्या आहेत. याच हेतूने साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाने आंतर भारती अनुवाद सुविधा केंद्र सुरू केले आहे. ही कामे वाढवीत अशी केवळ इच्छा नाही तर यात सहभागी होण्याचे प्रयत्न सर्वांनी करणे गरजेचे आहे.

        या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी एका फ्रेंच कथेचे, श्रीरंग खरावकर यांनी मेक्सिकन व वासंती वर्तक व या दोन्ही मान्यवरांनी एकत्रीत एका जर्मन कथेचे अभिवाचन सादर केले तर गेल्या वर्षीचा पहिला पुरस्कार ज्या परिवर्तनाचा वाटसरू या पाक्षीकाच्या संपादक मंडळ सदस्या प्रज्ञा दया पवार यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली. त्या म्हणाल्या वाटसरू हे परिघावरील व त्या बाहेर असलेल्या समाजाबद्दल लिहीत असतो,  भाषांतर हा ही तसाच बाहेरचा परिघ आहे. त्यास सन्मानीत केले जात आहे, हे नक्कीच स्फूर्तिदायक आहे. केल्याने भाषांतर या त्रैमासिकाचा परिचय नचिकेत कुलकर्णी यांनी, वी नीड यू च्या कार्याचा परिचय संजीव साने, पुरस्काराची भूमिका जयंत कुलकर्णी व कार्यक्रमाचे सहज व सुंदर सूत्रसंचालन डॉ.मृण्मयी भजक यांनी केले. 

Web Title: Build a bridge of communication! Winners of Prabodhan Award Distribution Program!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.