हुंड्यासाठी विवाहितेचा क्रूर छळ
By Admin | Updated: March 31, 2016 02:44 IST2016-03-31T02:44:41+5:302016-03-31T02:44:41+5:30
हुंड्यासाठी सासरच्यांनी विवाहीतेस बेदम मारहाण केल्याची घटना या शहरात घडली आहे. पती, सासू, मोठा दिर यांनी संगनमत करुन मारहाण केल्यचा आरोप तिच्या कुटुंबियांनी

हुंड्यासाठी विवाहितेचा क्रूर छळ
नालासोपारा : हुंड्यासाठी सासरच्यांनी विवाहीतेस बेदम मारहाण केल्याची घटना या शहरात घडली आहे. पती, सासू, मोठा दिर यांनी संगनमत करुन मारहाण केल्यचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला असला तरी पोलीसांनी मात्र मारहाणीचा गुन्हा दाखल करुन पतीला अटक केली आहे.
रुक्सार साजिद चौहाण असे तिचे नाव आहे. माहेरहून पैसे, दागिने घेऊन यावे, यासाठी तिचा छळ होत होता. मंगळवारी किरकोळ कारणावरुन पती, सासू आणि मोठा दिर यांनी तिला मारहाण करुन तिला स्लायडींगच्या विंडोवर ढकलले. फुटलेल्या काचा घुसून तिच्या दोन्ही हाताला गंभीर जखमा झाल्या. हातावर अठरा टाके पडलेत. सहा महिन्यापूर्वी सुध्दा अशाच प्रकारे तिला मारहाण झाली होती. परंतु समझौता करुन तिला परत पाठवले होते, असे तिचे वडिल सलिम कुरेशी यांनी सांगितले.
केवळ मारहाण झाली असल्याची तक्रार आमच्याकडे असल्याने आम्ही तसा गुन्हा दाखल केला आहे. पती साजीद, मोठा दिर शाहिद, सासू रुक्साना या तिघांविरोधात नालासोपारा पोलिस ठाण्यात संगनमत करुन मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करुन पतीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रविंद्र बडगुजर यांनी दिली. मात्र यापेक्षा अधिक गंभीर स्वरुपाचा गुन्हा पोलिसांनी करायला हवा होता. तो झाला नाही तर आम्ही वरीष्ठांकडे दाद मागू असे तिच्या वडीलांनी म्हटले आहे.
(प्रतिनिधी)