भांडण सोडविण्यास गेलेल्या बहिणीची भावाने केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 13:44 IST2018-02-04T13:41:32+5:302018-02-04T13:44:48+5:30

The brother of a sister who went to solve the problem killed the murderer | भांडण सोडविण्यास गेलेल्या बहिणीची भावाने केली हत्या

भांडण सोडविण्यास गेलेल्या बहिणीची भावाने केली हत्या

ठळक मुद्देभाऊ आणि वहिनीचे भांडण सोडविण्यास बहिण गेली होती.तू आमचे भांडण सोडविण्यास कां आली? असा जाब विचारीत केला वार भाऊ लक्ष्मण कुºहाडे(५५) याच्या विरोधात पोलीसांत गुन्हा दाखल

भिवंडी : भाऊ आणि वहिनीचे भांडण सोडविण्यास गेलेल्या बहिणीच्या छातीत चाकूने वार करून भावाने हत्या केल्याची घटना काल रात्री दरम्यान शहरातील भाग्यनगरमध्ये घडली.
तिपोम्माबाई सोनु शिंदे (६०)असे मृत महिलेचे नांव असुन ती कामतघर-भाग्यनगर मध्ये रहात होती. तीच्या शेजारी रहाणारा भाऊ लक्ष्मण देवराम कुºहाडे याचे त्याच्या बायको बरोबर काल रात्री सव्वासात वाजता भांडण सुरू होते.त्यांचे भांडण सोडविण्यास लक्ष्णमची बहिण तिपोम्माबाई शिंदे गेली.तेंव्हा लक्ष्मणला राग येऊन तू आमचे भांडण सोडविण्यास कां आली? असा जाब विचारीत त्याने हातातील धारदार चाकूने बहिण तिपोम्माच्या छातीच्या डाव्या बाजूला वार केले.त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या तिमोप्पाबाईला जवळच्या दवाखान्यात नेले.परंतू उपचार करण्यापुर्वीच तिचा मृत्यु झाला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात विलास रामदास कुºहाडे याने आरोपी लक्ष्मण कुºहाडे(५५) याच्या विरोधात तक्रार दिली असुन पोलीसांनी आरोपीस आद्याप अटक केलेली नाही.

Web Title: The brother of a sister who went to solve the problem killed the murderer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.