शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

ब्रिटिशकालीन कन्या शाळेवर बुलडोझर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 02:50 IST

डिजिटल शाळेच्या नावाखाली करोडो रुपयांची केली गेलेली खरेदी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आहे की कंपन्यांसह स्वत:च्या चांगभलंसाठी, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

- सुरेश लोखंडेडिजिटल शाळेच्या नावाखाली करोडो रुपयांची केली गेलेली खरेदी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आहे की कंपन्यांसह स्वत:च्या चांगभलंसाठी, असे जाणकारांचे म्हणणे आहे. ‘शिक्षणाचा हक्क’ कायद्याखाली प्राथमिक शाळांना आठवीचा वर्ग जोडला आहे. त्यात विज्ञान शिकवणाऱ्या शिक्षकांची भरती जिल्हा परिषदेने केली नाही. असे असताना डिजिटल शाळेत तज्ज्ञांचा अभाव असेल तर विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार तरी कसा. एवढेच नव्हे तर हसतखेळत शिक्षणाच्या नावाखाली सेस फंडाचे करोडो रूपये केवळ कार्ड छापण्यात गेले. त्यांचा विद्यार्थ्यांना एका दिवसाच्या शिक्षणाकरिताही लाभ झाला नाही. विद्यार्थीसंख्येअभावी जिल्ह्यातील ३९० शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत.स्मार्ट सिटीच्या उंबरठ्यावर असलेल्या ठाणे शहरात बीजे हायस्कूल व माध्यमिक कन्या शाळा आहे. या दोन्ही माध्यमिक शाळा ब्रिटिशकालीन असून जिल्हा परिषदेच्या आहेत. यातील बी.जे. हायस्कूलचे काम मागील चार वर्षांपासून सुरू आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात त्या इमारतीत आपला प्रवेश होईल अशी या विद्यार्थ्यांना अपेक्षा आहेत. सध्या त्यातील विद्यार्थ्यांचे वर्ग कन्या शाळेत भरतात. ब्रिटिशांनी १९४१ मध्ये सुरू केलेली कन्या शाळा आज केवळ तग धरून उभी आहे. जिल्हा परिषद इमारतीच्या जवळच असलेल्या या कन्या शाळेत विद्यार्थिनींची वानवा आहे. पाचवी ते दहावीचे वर्ग असलेल्या या शाळेच्या दोन दुमजली इमारतीपैकी एका धोकादायक इमारतीचा एक मजला पाडावा लागला. तळमजल्यावर वर्ग भरत नसून तेथे आता जिल्हा परिषदेचे मध्यवर्ती अभिलेख कक्ष आहेत.विद्यार्थिनींच्या संख्येअभावी ही कन्या शाळाच बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बी.जे. हायस्कूलमध्ये या विद्यार्थिनींचा समावेश करून ही शाळा बंद करायची आणि त्या भूखंडाचा मलिदा खायचा डाव असल्याचे बोलले जात आहे. गोरगरिबांच्या मुलींसाठी सुरू केलेली ही शाळा शिक्षण विभागाच्या दुर्लक्ष व निष्काळजीपणामुळे बंद पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. या दहावीपर्यंतच्या या शाळेत केवळ ४० ते ४२ विद्यार्थिनी आहेत. ग्रामीण भागात विद्यार्थी संख्येसह शाळा डिजिटल करण्याचा दावा करणाºया जिल्हा परिषदेने येथे मात्र काहीच केले नाही. शहरात असूनही जिल्हा परिषदेच्या या शाळेतील विद्यार्थिनी डिजिटल शाळेपासून वंचित आहेत.ब्रिटिशांनी सुरू केलेली ही कन्या शाळा माध्यमिक आहे. येथे मुलींचे दहावीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आहे. ठाणे शहराचे ऐतिहासिक भूषण असलेल्या या कन्या शाळेत गोरगरिबांच्या मुली शिक्षण घेत आहेत. जुन्या काळच्या दुमजली दोन इमारती, प्रवेशद्वारास लागून शाळेचे कार्यालय, त्यासमोर भले मोठे मैदान, त्यात सांस्कृतिक कार्यक्रमासाठी असलेला रंगमंच अशी प्रशस्त जागा कुणालाही भुरळ पाडणारी आहे. जुन्या बनावटीची ही इमारत ब्रिटिशकालीन राजवटीची साक्षीदार आहे. मैदानात विहीर असून त्यावर स्लॅब टाकलेला आहे. या विहिरीच्या पाण्याचा वापर शाळेकडून केला जात आहे. ब्रिटिशांचे प्रशासकीय कामकाज या ‘श्रीस्थानक’ (ठाण्याचे जुने नाव) येथून सुरू होते.देशातील पहिल्या रेल्वेचे स्वागत १६ एप्रिल १८५३ साली याच कन्या शाळेच्या विद्यार्थिनी व बी.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केले होते. त्यामुळे हा‘ऐतिहासिक ठेवा ’ जतन करणे अपेक्षित आहे. श्रीस्थानकचे ठाणे महानगर झाले आणि आता स्मार्ट सिटी होण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यात या ऐतिहासिक शाळेच्या इमारतीचे जतन होणे अपेक्षित आहे. शहरातील महागड्या शाळेत गरिबांच्या मुलींचे शिक्षण होणार नाही. त्यांना या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून सबळ होण्याची संधी देण्याची गरज आहे.ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागात ठाणे जिल्हा परिषदेच्या एक हजार ३३१ शाळा विद्यादानाचे कार्य करीत आहेत. त्यात ८१ हजार ३५१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या ग्रामीण, डोंगराळ, दुर्गम भागातील गावखेडी रात्रंदिवस विजेच्या लोडशेडिंगने त्रस्त आहेत. त्यात शाळा डिजिटल करण्याचा जिल्हा परिषदेचा अट्टहास हा केवळ खर्चिक आहे. आचारसंहितेच्या काळात या शाळांसाठी संगणकीय साहित्यपुरवठा करण्यात जिल्हा परिषद आघाडीवर आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाच डिजिटल शाळांचे संगणकीय साहित्य कधी खरेदी केले आणि ते शाळांपर्यंत कसे पोहोचले, याचे कोडे खुद्द शिक्षण समितीच्या सदस्यांना सतावत आहे.

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळा