जागा बळकविण्याच्या वादातून महिलेवर विटेने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:39 IST2021-03-25T04:39:33+5:302021-03-25T04:39:33+5:30

ठाणे : कपडेविक्री करण्यासाठी राखून ठेवलेली जागा बळकविण्यासाठी विपुल याने सोनी वाघेला (२५, रा. कोपरी, ठाणे) या महिलेच्या डोक्यावर ...

Brick attack on woman over land grabbing dispute | जागा बळकविण्याच्या वादातून महिलेवर विटेने हल्ला

जागा बळकविण्याच्या वादातून महिलेवर विटेने हल्ला

ठाणे : कपडेविक्री करण्यासाठी राखून ठेवलेली जागा बळकविण्यासाठी विपुल याने सोनी वाघेला (२५, रा. कोपरी, ठाणे) या महिलेच्या डोक्यावर विटेने हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात विपुल याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सोनी वाघेला आणि तिची जाऊ शोभा या दोघींनी कपडाविक्रीसाठी कोपरीतील सिद्धार्थनगर येथील बबनराव शिंदे सभागृहात २२ मार्च रोजी सकाळी ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास जागा राखून ठेवली होती. त्याचवेळी संगी, विनोद चेखालिया, विपुल आणि नरेश या चौघांनी तिथे येऊन याच जागेवरून सोनी हिच्याबरोबर वाद घातला. याच रागातून तिचे कपड्यांंचे गाठोडे फेकून देऊन सोनी, शोभा, तिची सासू तसेच दीर दीपक यांना शिवीगाळ आणि दमदाटी केली. दीपक याला मारण्यासाठी चहाच्या टपरीजवळ असलेली वीट घेतली. त्यावेळी यात मध्यस्थी करण्यासाठी सोनीने धाव घेतली. तेव्हा ती सोनी हिच्या डोक्यात मारून तिला जखमी केले. याप्रकरणी चौघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Brick attack on woman over land grabbing dispute