लाचखोर संजय घरतचे आज निलंबन होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 02:26 IST2018-06-19T02:26:45+5:302018-06-19T02:26:45+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे लाचखोर अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई सुरू झाली असून अधिनियम तपासून घरत यांंचे निलंबन मंगळवारी करण्यात येईल, असे आयुक्त गोविंद बोडके यांनी सांगितले.

लाचखोर संजय घरतचे आज निलंबन होणार
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे लाचखोर अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई सुरू झाली असून अधिनियम तपासून घरत यांंचे निलंबन मंगळवारी करण्यात येईल, असे आयुक्त गोविंद बोडके यांनी सांगितले.
बेकायदा बांधकाम प्रकरणात आठ लाखांची लाच घेणाऱ्या घरत यांच्यावरील कारवाईचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सोमवारी बोडके यांना पाठवला.
घरत यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने १३ जून रोजी अटक केली होती. त्यांना दोन वेळा पोलीस कोठडी मिळाली आहे. मंगळवारी पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
सात तासांच्या कारवाईनंतर घरत यांच्या केबिनची चावी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कारवाई पथकाने महापालिका प्रशासनाकडे दिली होती. ही केबिन आजपर्यंत टाळेबंद असून केबिनबाहेर असणारा घरत यांचा नामफलक महापालिकेने अद्याप काढलेला नाही. निलंबन होताच त्याचा फलकही काढला जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
घरत यांच्या दालनात व दालनाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे होते. या कॅमेºयातील सीसीटीव्ही फुटेज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने तपासले आहेत. घरत पोलिसांना तपासकार्यात सहकार्य करत नाहीत. घरत यांच्यासारखा उच्चपदस्थ अधिकारी चौकशीच्या फेºयात अडकल्याने महापालिकेतील अधिकारी धास्तावले असून, कामाचा वेग मंदावला आहे.