नगरसेविकेच्या फलकाची मोडतोड
By Admin | Updated: February 20, 2017 05:37 IST2017-02-20T05:37:55+5:302017-02-20T05:37:55+5:30
मीरा रोडच्या संघवीनगर येथील महापालिका उद्यानाच्या विकासकार्याचा नगरसेविकेने लावलेला फलक व नावाच्या पाटीची तीन

नगरसेविकेच्या फलकाची मोडतोड
मीरा रोड : मीरा रोडच्या संघवीनगर येथील महापालिका उद्यानाच्या विकासकार्याचा नगरसेविकेने लावलेला फलक व नावाच्या पाटीची तीन ते चार अनोळखी व्यक्तींनी मोडतोड केल्याची घटना घडली. राजकीय वादातून हा प्रकार घडल्याची शक्यता असून काशिमीरा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे.
मीरा रोडच्या प्लेझंट पार्क, सिल्व्हर पार्क परिसरातील प्रभाग ४३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चक्रे व शिल्पा भावसार या दोन नगरसेविका आहेत. संघवीनगर येथील जॉन मेंडोन्सा उद्यानाचे उद्घाटन नुकतेच वंदना चक्रे यांनी केले.
दरम्यान, उद्यानाच्या ठिकाणी भावसार यांनीही आपल्या प्रयत्नांनी झालेल्या कामांचा फलक लावलेला होता. तसेच पालिकेने बांधलेल्या वास्तूच्या ठिकाणी उद्यानातील खेळणी भावसार यांच्या प्रभाग समिती निधीतून बसवल्याची पाटीदेखील होती.
पहाटे अडीचच्या सुमारास ३ ते ४ अनोळखी व्यक्तींनी भावसार यांचा लागलेला फलक मोडून टाकला. तसेच दगडी पाटीसुद्धा काढली. हा प्रकार कळताच भावसार यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. झालेली घटना येथील एका इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (प्रतिनिधी)