चाळी तोडा अन्यथा पाडू - रेल्वे
By Admin | Updated: November 15, 2016 04:16 IST2016-11-15T04:16:55+5:302016-11-15T04:16:55+5:30
रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करून त्याठिकाणी बेकायदा चाळी बांधून अडीचशेहून अधिक गरीब कुुटुंबयांची फसवणूक झाली आहे. या चाळी पाडा अन्यथा

चाळी तोडा अन्यथा पाडू - रेल्वे
शशी करपे / वसई
रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करून त्याठिकाणी बेकायदा चाळी बांधून अडीचशेहून अधिक गरीब कुुटुंबयांची फसवणूक झाली आहे. या चाळी पाडा अन्यथा त्यापाडण्यात येतील अशा नोटिसा रेल्वेने संबंधितांना दिल्याने चाळमाफियांचा मोठा घोटाळा चव्हाट्यावर आला आहे. यामुळे अडीचशेहून अधिक कुुटुंबे बेघर होणार आहेत.
नालासोपारा पूर्वेकडील मोरेगावात सुमारे १२ चाळमाफियांनी १५ वर्षांपूर्वी रेल्वेच्या जागेवर अतिक्र मण करून बेकायदा चाळी बांधून विकल्या. हा परिसर जिजाईनगर नावाने ओळखले जाते. रुम विकतांना करारनाम्यात रेल्वेऐवजी दुसऱ्याचा सातबारा जोडून फसवणूक केल्याचे आता उजेडात आले आहे. या करारनाम्यानुसार लोकांना तत्कालीन नालासोपारा नगरपालिकेने घरपट्टी आणि पाणी पट्टी आकारणी केली आहे. येथील लोकांकडे १५ वर्षांपासून रेशन कार्ड आहेत. त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट आहेत. वीज दिलेली आहे. आधारकार्ड, पॅनकार्डेही आहेत.
पण, जागेवर अतिक्रमण करून बेकायदा बांधकाम केले असल्याने आपण बांधकाम स्वत:हून पाडावे अन्यथा रेल्वे ते पाडून त्यासाठी झालेला खर्च आपणाकडून वसूल करेल अशी नोटीस रेल्वेने प्रत्येक घरमालकाच्या नावानिशी बजावली आहे. रेल्वेने रेल्वे कोर्टात याप्रकरणी खटलाही दाखल केला आहे. तसेच अतिक्रमण तोडतांना रेल्वे त्यांना पर्यायी जागा देणार नसल्याने ही कुटुंबे बेघर होणार आहेत. शिवसेनेने गटनेते नगरसेवक धनंज गावडे यांनी सर्व एकत्रित करून जिजाई नगर रहिवासी संघाची स्थापना केली आहे. त्याची पहिली सभा सोमवारी पार पडली. यावेळी शिवसेना शहर कार्यालयप्रमुख रमेश मोरे, शाखाप्रमुख रविकांत नागरे, सुनयना विलास साळुंखे, संघातर्फे विनोद सहानी यांनी लोकांना मार्गदर्शन केले.