ठाणे - पाटणा एक्स्प्रेसच्या (ट्रेन क्रमांक - १३२०१) लोकोपायलटच्या प्रसंगावधानतेमुळे मध्य रेल्वेवरील खडवली - टिटवाळादरम्यान मोठा रेल्वे अपघात टळला आहे. रेल्वे रुळाला तडा गेल्याचे लोकोपायलट एस. मुरुगन यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी आपत्कालीन (इमर्जन्सी) ब्रेक दाबून एक्स्प्रेस थांबवली. ही घटना आज सकाळी ९.४५ ते १०.१५ दरम्यान घडली. मात्र, मुरुगन यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, रेल्वे रुळाला तडा गेल्यानं विस्कळीत झालेली वाहतूक अर्ध्या तासानं पूर्ववत करण्यात आली.
शाब्बास! लोकोपायलटच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा रेल्वे अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 18:10 IST
ही घटना आज सकाळी ९.४५ ते १०.१५ दरम्यान घडली.
शाब्बास! लोकोपायलटच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा रेल्वे अपघात
ठळक मुद्देरेल्वे रुळाला तडा गेल्याचे लोकोपायलट एस. मुरुगन यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी इमर्जन्सी ब्रेक दाबून एक्स्प्रेस थांबवली.रेल्वे रुळाला तडा गेल्यानं विस्कळीत झालेली वाहतूक अर्ध्या तासानं पूर्ववत करण्यात आली.