केडीएमसीच्या कचरा डंपरचा ब्रेक फेल: वाहनांचे नुकसान
By मुरलीधर भवार | Updated: January 3, 2025 19:59 IST2025-01-03T19:59:21+5:302025-01-03T19:59:35+5:30
कल्याण पूर्वेतील पुना लिंक रोडवर धक्कादायक प्रकार.

केडीएमसीच्या कचरा डंपरचा ब्रेक फेल: वाहनांचे नुकसान
मुरलीधर भवार-कल्याणकल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कचरा गोळा करणाऱ््या डंपरचा ब्रेक फेल झाला. हा डंपर रस्त्याच्या विरुद्ध दिशेने घुसला. या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी रस्त्यावर उभ्या असलेल्या सात ते आठ गाड्यांचे नुकसान झाले आहे. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी डंपरचा चालक फिहिद अन्सारी याला ताब्यात घेतले आहे. पोलिस या प्रकरणाच पुढील तपास करीत आहेत.
महापालिकेचा कचरा गोळा करणारा डंपर हा आज सायंकाळी पोटे मैदान परिसरात गेला हाेता. त्याठिकाणी साचलेला कचरा डंपरमध्ये टाकण्यात आला. कचरा घेऊन डंपर चक्की नाक्याच्या दिशेने चालला होता. या डंपरचा अचानक ब्रेक फेल झाला. चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटले. याचवेळी डंपरचे स्टेअरिंग ला’क झाले. ब्रेक फेल झाल्याने हा डंपर रस्त्याच्या विरुद्ध दिशेने घुसला. यावेळी रस्त्यावर उभ्याअसलेल्या सात ते आठ गाड्यांना उडविल्याने या गाड्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी डंपरचा चालक फहिद अन्सारी याला ताब्यात घेतले आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.