अंबरनाथ स्फोटप्रकरणी दोघांना अटक
By Admin | Updated: March 23, 2017 01:26 IST2017-03-23T01:26:27+5:302017-03-23T01:26:27+5:30
मिर्चीवाडी परिसरात झालेल्या स्फोट प्रकरणाच्या तपासाकडे आता एटीएसनेही लक्ष केंद्रित केले आहे. हा स्फोट मोठा असल्याने

अंबरनाथ स्फोटप्रकरणी दोघांना अटक
अंबरनाथ : मिर्चीवाडी परिसरात झालेल्या स्फोट प्रकरणाच्या तपासाकडे आता एटीएसनेही लक्ष केंद्रित केले आहे. हा स्फोट मोठा असल्याने त्यामागे नेमके कारण काय होते, याचा तपास केला जात आहे. या स्फोट प्रकरणात मिर्चीवाडी परिसरातून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचा या स्फोटाशी संबंध असल्याचे पुढे येत असले तरी नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आदिवासींनी पळदेखील काढला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत असले, तरी ही स्फोटके नेमकी आली कुठून, याचा आता तपास केला जात आहे. या स्फोटामागे स्थानिकांपैकी कुणाचा तरी हात असल्याची शक्यता पोलिसांना होती. त्यानुसार, याच परिसरातील श्रावण वाघे आणि अजय ऊर्फ पाली वायकर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. (प्रतिनिधी)