खूनप्रकरणी पत्नीसह दोघांना जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 07:23 AM2021-01-05T07:23:25+5:302021-01-05T07:23:32+5:30

Crime News पतीने आत्महत्या केल्याची माहिती तिने कळवा पोलिसांना दिली होती. त्यावेळी त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीने दिलेली माहिती आणि वैद्यकीय पुराव्याच्या आधारे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

Both sentenced to life imprisonment in murder case | खूनप्रकरणी पत्नीसह दोघांना जन्मठेपेची शिक्षा

खूनप्रकरणी पत्नीसह दोघांना जन्मठेपेची शिक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : घटस्फोटाला नकार देणाऱ्या पतीचा साथीदारांच्या मदतीने खून करणाऱ्या रुकया खान (२६, रा. कळवा, ठाणे) आणि शरीफ उर्फ चिपी असरफ शेख (३२, रा. कळवा, ठाणे) या दोघांना ठाणे न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर यातील तिसरा आरोपी धनराज चव्हाण (२०) याची मात्र सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.


ठाण्यातील विटावा येथे महादेव निवास येथे वास्तव्याला असलेल्या रुकया ही एका बारमध्ये कामाला होती. तिथेच तिचे एकाशी अनैतिक संबंध असल्याचा पती बहाद्दूर (३२) याला संशय होता.  यातूनच होणाऱ्या भांडणातून तिने त्याच्याकडे घटस्फोटाची मागणी केली होती, तो तिला घटस्फोट देत नव्हता. डान्सबारमध्ये काम करण्याला होणारा विरोध, तसेच तो घटस्फोटही देत नसल्यामुळे रुकया हिने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने त्याचा कायमचा काटा काढायचा ठरविले. यातूनच तिने शरीफ आणि धनराज यांच्या मदतीने १४ ऑक्टोबर, २०१७ रोजी पती बहाद्दुर घरात झोपेत असताना, त्याचा नॉयलॉनच्या दोरीने गळा आवळून, तसेच उशीने दाबून खून केला. त्यानंतर, पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह छताला लटकविल्याचा बनाव केल्याचे सिद्ध झाले.

पतीने आत्महत्या केल्याची माहिती तिने कळवा पोलिसांना दिली होती. त्यावेळी त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीने दिलेली माहिती आणि वैद्यकीय पुराव्याच्या आधारे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक तुकाराम पवळे यांच्या पथकाने या प्रकरणी रुकया, तसेच तिचा साथीदार शरीफ आणि शरीफचा नोकर धनराज अशा तिघांना अटक केली.

तिघांना केली अटक 
n पतीने आत्महत्या केल्याची माहिती तिने कळवा पोलिसांना दिली होती. त्यावेळी त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीने दिलेली माहिती आणि वैद्यकीय पुराव्याच्या आधारे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी रुकया, तसेच तिचा साथीदार शरीफ आणि शरीफचा नोकर धनराज अशा तिघांना अटक केली.
 

Web Title: Both sentenced to life imprisonment in murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jailतुरुंग