शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
6
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
7
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
8
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
9
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
10
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
11
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
12
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
13
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
14
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
15
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
16
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
17
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
18
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
19
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
20
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?

अश्लील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपप्रकरणी नाशिक येथून दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 05:13 IST

लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ पुरवणाऱ्या ‘बीबी बॅड बॉइज’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप प्रकरणात पोलिसांनी नाशिक शहरातून दोघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अटक केली आहे.

धीरज परब मीरा रोड : लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ पुरवणाऱ्या ‘बीबी बॅड बॉइज’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप प्रकरणात पोलिसांनी नाशिक शहरातून दोघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात एकूण अटक आरोपींची संख्या सात झाली आहे. केवळ देशातीलच नव्हे, तर काही आंतरराष्ट्रीय सदस्यही या ग्रुपमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.नऊ ते १२ वर्षे वयोगटांतील मुलामुलींशी शरीरसंबंध कसे ठेवायचे, यासाठी त्यांना प्रवृत्त कसे करायचे, याच्या व्हिडीओ क्लिप्स आणि छायाचित्रे पुरवण्याचे काम काही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर सुरू असल्याची माहिती मीरा रोडचे रहिवासी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप सामंत यांना मिळाली होती. सामंत हे सामाजिक उद्दिष्टांसाठी हॅकिंगचे ज्ञान बाळगून असल्याने त्यांनी अशा प्रकारचे चार व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप शोधून काढले. भार्इंदरच्या नवघर भागातील एका तरु णाचा बीबी बॅड बॉइज या ग्रुपमध्ये सहभाग असल्याचे त्यांना समजले. सामंत यांनी हा ग्रुप हॅक करून त्यातील २२० सदस्यांची नावे, त्यांचे मोबाइल नंबर, ई-मेल आयडी आणि त्यांच्या लोकेशनपासून त्यांनी ग्रुपमध्ये कायकाय शेअर केले, याचा संपूर्ण तपशील जमा केला. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक नवल बजाज यांना भेटून या प्रकाराची संपूर्ण माहिती त्यांनी दिली. बजाज यांनी सहायक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे या प्रकरणाचा तपास दिला.नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर कुलकर्णी यांच्यासह इतर पोलीस पथकांनी आरोपींचे अटकसत्र सुरू केले. तूर्तास पोलिसांनी बॅड बॉइज या एकाच ग्रुपच्या आरोपींचे अटकसत्र चालवले आहे. या ग्रुपच्या २२० सदस्यांपैकी तीन अ‍ॅडमिन असून ४० सदस्य महाराष्ट्रातील, तर उर्वरित सदस्य हे गुजरातसह विविध राज्यांतील आहेत.पोलीस पथकांनी विविध ठिकाणी छापे टाकून पाच आरोपी आयटी अ‍ॅक्टअन्वये अटक केले होते. शनिवारी पोलिसांनी नाशिक शहरामधून १९ आणि २५ वर्षे वयाच्या दोन तरु णांना अटक केली. ठाणे न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे. ग्रुपचे सदस्य त्यांच्या परिचितांकडून ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यासाठी परस्पर पैसेही उकळत होते. ग्रुपच्या अ‍ॅडमिनला अटक केल्यानंतर या रॅकेटचा एकूणच विस्तार, कार्यपद्धती आणि आर्थिक व्यवहार समोर येण्याची शक्यता आहे. अशाच प्रकारचे आणखी तीन व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सुरू असल्याची पोलिसांची माहिती आहे.

टॅग्स :Arrestअटक