घराचे प्लास्टर पडून दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 23:55 IST2019-05-24T23:55:01+5:302019-05-24T23:55:05+5:30
उपचार सुरू : शुक्रवारी पहाटेची घटना

घराचे प्लास्टर पडून दोघे जखमी
ठाणे / मुंब्रा : मुंब्य्रातील दत्तवाडी परिसरातील तळ अधिक एक मजली घराचे प्लास्टर पडल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. यामध्ये त्या घरात राहणारे असीफ शेख (३७) आणि शमा शेख (२७) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारार्थ कळवा, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे.
दत्तवाडी चाळीत सलीम यांच्या मालकीचे घर आहे. ते घर शेख कुटुंबीयांनी भाड्याने घेतले आहे. शुक्रवारी पहाटे सव्वाचारला शेख कुटुंब झोपी गेले असताना अचानक घराच्या छताचे प्लास्टर दोघांवर पडले. यामध्ये असीफ, शमा यांना दुखापत झाली.
मुंबई : ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेल्या बीडीडी चाळींची स्थिती आता दयनीय झाली आहे. वरळी येथील बीडीडी चाळींमधील चाळ क्रमांक ७६ च्या छताचा भाग बुधवारी सायंकाळच्या सुमारास अचानक कोसळला. या वेळी या ठिकाणी कोणीही नसल्याने या घटनेमध्ये सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही.