हत्यारे बाळगणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 06:22 IST2018-05-13T06:22:35+5:302018-05-13T06:22:35+5:30
ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात शस्त्र बाळगण्यास आयुक्तांचा मनाई आदेश असताना गुप्ती आणि दोन लोखंडी पाइप बाळगणाºया

हत्यारे बाळगणाऱ्या दोघांना अटक
ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात शस्त्र बाळगण्यास आयुक्तांचा मनाई आदेश असताना गुप्ती आणि दोन लोखंडी पाइप बाळगणाºया मोहंमद आविद शेख (३२, रा. मुंब्रा) आणि वसीम शेख २८, रा. मुंब्रा ) या दोघांनाही नौपाडा पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून लोखंडी गुप्ती आणि दोन लोखंडी पाइप हस्तगत करण्यात आले आहेत.
मोहंमद आविद आणि वसीम हे दोघेही आम्रपाली चौक ते चिंतामणी ज्वेलर्सदरम्यान सेंट जॉन बाप्टिस्ट शाळेजवळील रस्त्यावर ११ मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रिक्षाच्या बाजूस संशयास्पदरीत्या उभे होते. त्याचवेळी गस्तीवरील पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीमध्ये ही हत्यारे पोलिसांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक एस. ए. यादव हे अधिक तपास करत आहेत.