गंडवणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

By Admin | Updated: January 12, 2017 07:00 IST2017-01-12T07:00:20+5:302017-01-12T07:00:20+5:30

पैशांच्या आमिषाने हातात कागद टेकवून विद्यार्थ्याला २० हजार रुपयांना गंडवणाऱ्या भामट्याला नयानगर

Both of the corrupt people are in police custody | गंडवणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

गंडवणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

मीरा रोड : पैशांच्या आमिषाने हातात कागद टेकवून विद्यार्थ्याला २० हजार रुपयांना गंडवणाऱ्या भामट्याला नयानगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.
शांती पार्कमधील वृंदावन टॉवरमध्ये राहणारा अरुण ठाकूर (२१) पुनमसागर वसाहतीत असलेल्या अलाहाबाद बँकेत पैसे काढण्यासाठी गेला. त्यावेळी तेथे असलेल्या गुलशन विनोद अरोडा (२०) याने अरुणला गाठून १७ वर्षीय साथीदाराकडे नेले.
गुलशनने त्या अल्पवयीन मुलाकडे चोरीचे दीड लाख रुपये असल्याचे दाखवले. त्याला जर ३० हजार रुपये दिले, तर तो त्याच्याकडचे दीड लाख रुपये देईल. ते आपण वाटून घेऊ, असे त्यांनी अरुणला सांगितले.
पैशांच्या लोभापायी अरुण त्या दोघांसोबत मीरा रोड स्थानकाजवळ आला. तेथे अरुणने स्वत:कडचे २० हजार, तर गुलशनने १० हजार त्या साथीदारास दिले. गुलशनने दीड लाखांची बॅग अरुणच्या हातात देऊन ‘तू बँकेत चल, मी मागून येतो,’ असे सांगितले. अरुणने रिक्षात बसल्यावर नोटांचे बंडल पाहिले असता फक्त वरची नोटच दोन हजारांची होती. (प्रतिनिधी)

Web Title: Both of the corrupt people are in police custody