शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही चिमुरडे वाचले, मात्र मातृछत्र हरपले; भिवंडी इमारत दुर्घटनेत आईचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 08:04 IST

इमारत कोसळल्याचे कळताच तिथे धाव घेतलेल्या बहिणीने भावाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, पोलिसांनी तिला पुढे जाण्यास मज्जाव केला.

भिवंडी - इमारत दुर्घटनेत महतो परिवारावर काळाने घाला घातला. दोन चिमुरड्यांसह त्यांची आई ढिगाऱ्याखाली अडकली. बचाव पथकाने मोठ्या परिश्रमाने दोन्ही चिमुरड्यांची सुटका केली. मात्र, आई दगावल्याने मातृछत्र हरपले. लक्ष्मी रवी महतो (३२) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. प्रिन्स रवी महतो (५) व चिंकू रवी महतो (३) अशी  चिमुरड्यांची नावे आहेत.  लक्ष्मी यांचे पती रवी महतो कामावर गेले होते. दरम्यान, मुलांना उपचारासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आले.

भावाचा निदान आवाज तरी ऐकू दे...इमारत कोसळल्याचे कळताच तिथे धाव घेतलेल्या बहिणीने भावाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, पोलिसांनी तिला पुढे जाण्यास मज्जाव केला. यावेळी, ‘मला माझ्या भावाचा निदान आवाज तरी ऐकू दे,’ अशी आर्त साद तिने पोलिसांना घातली. दिवा येथे राहणारा सुधाकर गवई (२६) हा तरुण या कंपनीत कामाला आहे. बहिण विक्रोळीत राहाते. घटनेबाबत कळल्यानंतर तिने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ढिगाऱ्याखालून आवाज येत असल्याचे सांगितले. तेव्हा मला माझ्या भावाला बघायचे आहे, मला पुढे जाऊ द्या, असे ती पोलिसांना म्हणाली.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाbhiwandiभिवंडी