शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज देण्याच्या नावाखाली छोट्या व्यापा-यांना गंडा घालणा-या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 23:52 IST

कर्ज देण्याच्या नावाखाली लहान व्यापा-यांना गंडा घालणा-या अतुल शर्मा ऊर्फ अनयाल (३०) आणि भरत जोशी (५५, रा. दोघेही वर्तकनगर, ठाणे) या दुकलीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-५ वागळे इस्टेट पथकाने अटक केली आहे.

ठाणे : कर्ज देण्याच्या नावाखाली लहान व्यापा-यांना गंडा घालणा-या अतुल शर्मा ऊर्फ अनयाल (३०) आणि भरत जोशी (५५, रा. दोघेही वर्तकनगर, ठाणे) या दुकलीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-५ वागळे इस्टेट पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून असे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.ठाण्यातील एका पानटपरीचालकाला या जोडगोळीने ९० हजारांचा गंडा घातल्याचा गुन्हा वर्तकनगर पोलीस ठाण्यात २७ सप्टेंबर २०१७ रोजी दाखल झाला. त्याचा तपास वर्तकनगर पोलिसांबरोबर गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही सुरू होता. युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे, उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे, हवालदार देविदास जाधव, नाईक दिलीप शिंदे, राजकुमार पाटील, राजेंद्र गायकवाड आदींनी मिळालेल्या खब-याच्या तसेच मोबाइल लोकेशन टॉवरच्या आधारे आधी जोशीला किसननगर भागातून अटक केली. त्यापाठोपाठ अतुल याचीही धरपकड करण्यात आली. दोघांनाही आता सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांनी आतापर्यंत नौपाडा, वर्तकनगर, श्रीनगर या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रांतील २० ते २५ छोट्या दुकानदारांना गाठून त्यांच्याकडून आठ ते १० लाख रुपये उकळल्याची माहिती तपासात समोर येत आहे. या दोघांनाही आता वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून वर्तकनगर पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.असे उकळायचे पैसे...पानटपरी चालक किंवा छोटे दुकानदार यांना कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवून अतुल अशी गि-हाईके शोधायचा. त्यांच्याकडून तीन धनादेश, पॅन कार्ड आणि आधार कार्ड घ्यायचा. त्यातील दोन धनादेश कॅन्सल केले जायचे. तर एक धनादेश मात्र तसाच ठेवला जायचा. त्याचा साथीदार जोशी मात्र संबंधित कर्जदाराच्या खात्यातील बॅलन्सची माहिती काढून स्वत:चे पॅनकार्ड दाखवून कॅन्सल न केलेला चेक वटवून पैसे काढत होता. दरम्यान, कर्जदाराला मात्र अशी बतावणी केली जायची की, ज्याला कर्ज काढण्यासाठी पैसे दिले आहेत, तो काम करीत नाही. अशाच प्रकारे ही दुक्कल व्यापाºयांकडून पैसे उकळत होती. एका टपरीचालकाने दिलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघड झाला. 

 

 

टॅग्स :Crimeगुन्हा