शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मैत्री जपावी तर ती अशी! आजारी मित्राला भेटण्यासाठी जॉनी लिव्हर पोहोचले थेट रुग्णालयात

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: July 16, 2025 08:51 IST

Thane: मित्राला भेटण्यासाठी जॉनी लिव्हर आले ठाण्यात, आपुलकीने केली विचारपूस

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: आपल्या हास्याने सर्व प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या डी महेश या मित्राला भेटण्यासाठी बॉलिवूडचे सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते हास्य सम्राट आज ठाण्यात आले होते. सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे उच्चारासाठी दाखल असलेल्या महेश यांची जॉनी लिव्हर यांनी विचारपूस करून डॉक्टरांचे देखील आभार मानले. महेश यांचे पाच लाखांचे शस्त्रक्रिया डॉक्टर अमोल गीते यांनी विनामूल्य केली. 

ट्रिपल वेसल डिसीज या आजाराने त्रस्त असलेले महेश दहा दिवसांपूर्वी सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल झाले होते. ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असून डॉक्टर अमोल गीते यांच्या रुग्णालयात ती पार पाडली. महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून त्यांनी ही शस्त्रक्रिया त्यांची विनामूल्य करून दिली. त्यांची ही बायपास सर्जरी यशस्वी झाली आणि जॉनी लिव्हर यांनी डॉक्टर गीते यांच्यासह त्यांच्या सर्व टीमचे आभार मानले. डॉक्टर गीते म्हणाले,"ही शस्त्रक्रिया अत्यंत जटिल होती, सुदैवाने ती यशस्वी पार पडली ही शस्त्रक्रिया करताना महेश वाचतील की नाही असा प्रश्न समोर होता परंतु आम्ही आमच्या प्रयत्नांनी ही सर्जरी यशस्वी केली. "

जॉनी लिव्हर यांनी महेश यांची चौकशी केली आणि 'तू अगदी ठणठणीत दिसत आहे' असे कौतुकद्वार देखील त्यांनी काढले. जॉनी लिव्हर प्रत्यक्ष भेटायला आल्यानंतर पाहून महेश देखील गहिवरले आणि त्यांनी जॉनी लिव्हर यांना मिठी देखील मारली. महेश यांच्या शस्त्रक्रियेचा आज सहावा दिवस होता आणि आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आले असे डॉक्टर गीते यांनी जाहीर केले.

टॅग्स :Johnny Leverजॉनी लिव्हरbollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटीthaneठाणे