शरीरसौष्ठव स्पर्धेत अकोल्याचा वैभव मरकंटवार विजयी
By Admin | Updated: February 13, 2017 04:56 IST2017-02-13T04:56:31+5:302017-02-13T04:56:31+5:30
ठाणे पोलीस आयुक्तालय आणि भिवंडी परिमंडळ-२ च्या वतीने कशेळी येथे पोलिसांसाठी झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत अकोला

शरीरसौष्ठव स्पर्धेत अकोल्याचा वैभव मरकंटवार विजयी
भिवंडी : ठाणे पोलीस आयुक्तालय आणि भिवंडी परिमंडळ-२ च्या वतीने कशेळी येथे पोलिसांसाठी झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत अकोला येथील वैभव मरकंटवार विजेता ठरला. सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते त्याचा गौरव केला.
नारपोली पोलीस ठाण्याने स्पर्धेसाठी पुढाकार घेतला होता. विविध जिल्ह्यांतून पन्नासपेक्षा अधिक पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. द्वितीय क्र मांकाचे पारितोषिक जळगाव पोलीस पथकातील रवींद्र वंजारी याने, तर पीळदार शरीरयष्टीचा किताब अकोला येथील सुयश याने पटकावला. उगवता तारा हा किताब ठाणे शहर पोलीस दलातील बिपिन भोसले याने पटकावला.
पारितोषिक विजेत्यांना डुंबरे, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, सहायक पोलीस आयुक्त नरेश मेघराजानी, नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जाधव, मॉन्जिनीस फूड्स कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालक जोहर खुराकीवाला यांच्या हस्ते गौरविले.
विविध वजनी गटांतील गटविजेत्यांनाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कटके, मंगेश सावंत, बग्गा यासह देवानंद थळे, कृष्णकांत कोंडलेकर, इंद्रपाल भोईर, प्रवीण तरे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. (प्रतिनिधी)