जळालेल्या दुकानात सहा दिवसांनी आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:38 IST2021-03-08T04:38:13+5:302021-03-08T04:38:13+5:30

कल्याण : रेल्वे स्थानक परिसरातील पश्चिमेकडील भागात असलेल्या राहुल शूज या मोठ्या चप्पल विक्री करणाऱ्या दुकानाला गेल्या सोमवारी मध्यरात्रीच्या ...

The body was found six days later in the burnt shop | जळालेल्या दुकानात सहा दिवसांनी आढळला मृतदेह

जळालेल्या दुकानात सहा दिवसांनी आढळला मृतदेह

कल्याण : रेल्वे स्थानक परिसरातील पश्चिमेकडील भागात असलेल्या राहुल शूज या मोठ्या चप्पल विक्री करणाऱ्या दुकानाला गेल्या सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. यात संपूर्ण दुकान जळून खाक झाले होते. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते, परंतु या घटनेनंतर सहा दिवसांनी दुकानात जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहाची ओळख पटविणे अशक्य असल्याने विच्छेदनासाठी मृतदेह जे.जे. हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे.

आगीच्या घटनेनंतर शनिवारी सहा दिवसांनी दुकान मालक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून दुकानातील जळालेला ढिगारा बाहेर काढण्याचे काम करण्यात आले. साफसफाई करताना त्यांना दुकानाच्या एका कोपऱ्यात जळालेला मृतदेह आढळला. याची माहिती त्वरित महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याला देण्यात आली. मृतदेह संपूर्ण जळालेल्या अवस्थेत असल्याने, त्याचे वय किती, याचाही अंदाज येत नसल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले. शवविच्छेदन अहवाल आणि कलिना येथील फॉरेंन्सिक लॅबच्या रिपोर्टनंतर मृताचे नेमके किती वय आहे आणि मृत्यू कशामुळे झाला, याची माहिती उपलब्ध होणार आहे.

------------------------------------------------------

Web Title: The body was found six days later in the burnt shop