शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पावसामध्ये वाहून गेलेल्या ठाण्यातील युवकाचा मृतदेह न्हावाशेवामध्ये सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 21:02 IST

ठाणे, दि. 11 -  29 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामध्ये वाहून गेलेल्या ठाण्यातील युवकाचा मृतदेह न्हावाशेवा येथे समुद्रामध्ये सापडला. ओळख पटविण्यासाठी मृतदेहाची डिएनए तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.पावसामध्ये अडकलेली शेजारी महिला आणि मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात रामनगरातील अजय आठवाल 29 ऑगस्ट रोजी नाल्यामध्ये वाहून गेला होता. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन ...

ठाणे, दि. 11 -  29 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामध्ये वाहून गेलेल्या ठाण्यातील युवकाचा मृतदेह न्हावाशेवा येथे समुद्रामध्ये सापडला. ओळख पटविण्यासाठी मृतदेहाची डिएनए तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.पावसामध्ये अडकलेली शेजारी महिला आणि मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात रामनगरातील अजय आठवाल 29 ऑगस्ट रोजी नाल्यामध्ये वाहून गेला होता. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणोने बराच शोध घेऊनही उपयोग झाला नव्हता. शोध मोहीम तीव्र करण्यासाठी मध्यंतरी भारिप-बहुजन महासंघाने आंदोलनही केले होते. ठाण्यापासून जवळपास 50 किलोमिटर अंतरावर असलेल्या न्हावाशेवा येथील समुद्रामध्ये अजयचा मृतदेह पोलिसांना शनिवारी सापडला. 14 दिवसानंतर सापडलेला हा मृतदेह अतिशय कुजलेल्या अवस्थेत होता. मात्र मृतदेह सापडलेले ठिकाण, त्याचे वय यावरून मृतदेह अजयचाच असावा असा अंदाज आल्याने न्हावाशेवा पोलिसांनी श्रीनगर पोलिसांमार्फत त्याच्या पत्नीला ही माहिती दिली. अजयची पत्नी आणि आईने मृतदेहाची ओळख पटविली आहे. परंतु खात्रीसाठी मृतदेहाचा आणि अजयच्या आईचा डिएनए तपासणीसाठी पाठविला जाणार असून, त्यानंतरच मृतदेह नातलगांच्या स्वाधीन केला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हा