खाडीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:42 IST2021-03-27T04:42:02+5:302021-03-27T04:42:02+5:30
------------------------------------------------- दुचाकी चोरीला डोंबिवली : पश्चिमेकडील जुनी डोंबिवली परिसरातील मनिकाई निवासमध्ये राहणारे उमेश महाडिक यांनी त्यांची दुचाकी गुप्ते रोडवरील ...

खाडीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
-------------------------------------------------
दुचाकी चोरीला
डोंबिवली : पश्चिमेकडील जुनी डोंबिवली परिसरातील मनिकाई निवासमध्ये राहणारे उमेश महाडिक यांनी त्यांची दुचाकी गुप्ते रोडवरील मंगेश बार जवळ उभी केली होती. तेथून ती चोरीला गेल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
---------------------------------------
दोन मोबाइल लंपास
डोंबिवली : अस्लम शेख यांचे काटई परिसरात फर्निचरचे दुकान आहे. मंगळवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास ते दुकानाचे शटर अर्धवट स्थितीत उघडे ठेवून अंघोळीला निघून गेले. याचा फायदा उठवून दुकानातील दोन मोबाइल चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
------------------------------------------
दागिने लंपास
डोंबिवली : पूर्वेकडील एमआयडीसी मिलापनगरमधील आर.एल. १३७ मध्ये चोरट्यांनी १७ ते २५ मार्च या कालावधीत चोरी करून ६१ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अमर पाध्ये यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
-------------------------------------------
घरफोडी
डोंबिवली : पूर्वेकडील सावरकररोड परिसरातील न्यू सोनल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नेहा ढाके यांचे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. यात तीन घड्याळ, चांदीचे तांबे व सहा ग्लास यांचा समावेश आहे. ही घटना मंगळवारी रात्री ८ ते ९ या दरम्यान घडली. याप्रकरणी ढाके यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
------------