बेपत्ता मुलीचा मृतदेह आढळला
By Admin | Updated: January 14, 2017 06:24 IST2017-01-14T06:24:11+5:302017-01-14T06:24:11+5:30
तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चार वर्षांच्या मुलीचा मृतदेह एका नाल्याच्या गाळात आढळला. ही घटना भार्इंदरच्या

बेपत्ता मुलीचा मृतदेह आढळला
मीरा रोड : तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चार वर्षांच्या मुलीचा मृतदेह एका नाल्याच्या गाळात आढळला. ही घटना भार्इंदरच्या आझादनगर परिसरात उघडकीस आली.
मुलीची हत्या की, त्यात पडून मृत्यू झाला, हे शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी सांगितले. महिर्बुरजा मकबूल अहमद कुरेशी यांची चार वर्षांची मुलगी हुमेरा ही घराबाहेर खेळत असताना अचानक दिसेनाशी झाली. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा झाला. हुमेराचा शोध सुरू असतानाच आझादनगरदरम्यानच्या कच्च्या नाल्यात मृतदेह आढळला. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला असता तो हुमेरा हिचाच असल्याचे स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)