तलावात आढळला मृतदेह; अग्निशमनच्या जवानांनी पाण्याबाहेर काढला
By कुमार बडदे | Updated: May 12, 2023 14:40 IST2023-05-12T14:39:44+5:302023-05-12T14:40:50+5:30
मृत व्यक्ती कामासाठी त्या परीसरात आला होता

तलावात आढळला मृतदेह; अग्निशमनच्या जवानांनी पाण्याबाहेर काढला
कुमार बडदे, मुंब्रा
मुंब्रा - दिवा-शिळ रस्त्या जवळील खर्डी गावातील राधा-कृष्ण इमारती जवळ असलेल्या निर्मल नगरी तलावामध्ये शुक्रवारी दुपारी अंदाजित २८ वर्षे वयाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. शिळ अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह तलावाबाहेर काढून तो शिळ-डायघर पोलिसांच्या ताब्यात दिला. त्यांनी कायदेशीर बाबीची पुर्तता करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला असल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली.
दरम्यान मृत व्यक्ती कामासाठी त्या परीसरात आला होता. तसेच त्याचे नाव सुनिल असल्याची माहिती शिळ अग्निशमन केंद्राचे स्थानक अधिकारी पी.डी.पाटील यांनी स्थानिक नागरीकांनी दिलेल्या माहिती आधारे लोकमतला दिली. मृतदेहावर कुठल्याही प्रकारची जखम आढळून आली नाही.यामुळे पोहताना तो बुडाला असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पाटील यांनी व्यक्त केला आहे.