अखेर बुडालेल्या बालकाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:27 IST2021-07-01T04:27:02+5:302021-07-01T04:27:02+5:30

ठाणे : ठाकूरपाड्यातील खदानीमधील पाण्यात बुडालेल्या कळवा पूर्व येथील जित वर्मा या १६ वर्षीय बालकाचा मृतदेह बुधवारी सकाळी आठ ...

The body of the drowned child was finally found | अखेर बुडालेल्या बालकाचा मृतदेह सापडला

अखेर बुडालेल्या बालकाचा मृतदेह सापडला

ठाणे : ठाकूरपाड्यातील खदानीमधील पाण्यात बुडालेल्या कळवा पूर्व येथील जित वर्मा या १६ वर्षीय बालकाचा मृतदेह बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. त्यानंतर तो पोलिसांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

जित हा त्याच्या मित्रांसोबत कळवा पूर्व येथील ठाकूरपाड्यामधील खदानीत मंगळवारी दुपारी पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याने पाण्यात उडी मारल्यावर अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. बुडाल्यानंतर काही तासांनी ही माहिती मिळाल्याने ठाणे महापालिका आपत्ती कक्ष, अग्निशमन दल, टीडीआरएफ, पोलीस या विभागांनी धाव घेऊन शोधकार्य सुरू केले. शोधेपर्यंत अंधार झाल्यावर शोधकार्य थांबविण्यात आले होते. बुधवारी सकाळी स्थानिकांच्या मदतीने पुन्हा शोधकार्य सुरू केल्यावर त्याचा मृतदेह आढळून आला, अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली.

Web Title: The body of the drowned child was finally found