शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बॉबी खून प्रकरण: अखेर शिवमसह तिघांना पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 20:34 IST

लोकमान्यनगर येथील तरसेम सिंग उर्फ बॉबी (२५) याचा खून करणाºया शिवम तिवारी, राहूल यादव आणि आकाश निशाद या तिघांनाही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अलाहाबाद (उत्तरप्रदेश) येथून ताब्यात घेतल्यानंतर बुधवारी पहाटे वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.

ठाणे : लोकमान्यनगर येथील तरसेम सिंग उर्फ बॉबी (२५) याचा खून करणाºया शिवम तिवारी, राहूल यादव आणि आकाश निशाद या तिघांनाही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अलाहाबाद (उत्तरप्रदेश) येथून ताब्यात घेतल्यानंतर बुधवारी पहाटे वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. तिघांनाही या खून प्रकरणात अटक केली असून त्यांना २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.सावरकरनगर येथील ज्ञानोदय शाळेच्या समोरच ६ नोव्हेंबर २०१७ रोजी बॉबीची क्षुल्लक कारणावरून शिवमसह तिघांनी चाकूने भोसकून हत्या केली होती. तर त्याचा साथीदार अजय सिंग याच्यावरही शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले होते. खून झाल्यानंतर पसार झालेले हे टोळके अलाहाबाद येथे असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे आणि हवालदार दिलीप शिंदे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बेंद्रे, हवालदार एस. सी. गोरे, नाईक राजेंद्र गायकवाड आणि दिलीप शिंदे आदींनी त्यांना ११ नोव्हेंबर रोजी अलाहाबाद रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. त्यांना ‘ट्रान्झिस्ट कस्टडी’ (अलाहाबाद ते ठाणे दरम्यान प्रवासाची) देण्याची मागणी अलाहाबाद कनिष्ठ न्यायालयात १२ नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती. या न्यायालयाने अलाहाबादच्या मुख्य न्यायालयाकडून ही अनुमती घेण्यास पोलिसांना आदेश दिले. तेंव्हा १५ नोव्हेंबरपर्यत ही ट्रान्झिस्ट कस्टडी अलाहाबाद मुख्य न्यायालयाने १३ नोव्हेंबर रोजी दिली. दोन दिवसांच्या प्रवासानंतर या तिघांनाही बुधवारी पहाटेच्या सुमारास वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ठाणे न्यायालयात त्यांना हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. एस. तांबे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

 

 

टॅग्स :Crimeगुन्हा