बोट मालकीणीवर खलाशाने केले वार

By Admin | Updated: April 26, 2017 00:21 IST2017-04-26T00:21:42+5:302017-04-26T00:21:42+5:30

उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भूतोडी बंदर येथील बोट मालकीणीवर खलाशाने ब्लेडने वार केल्याची घटना सोमवारी दुपारी सुमारास घडली.

Boat ownership is made by sailors | बोट मालकीणीवर खलाशाने केले वार

बोट मालकीणीवर खलाशाने केले वार

भार्इंदर : उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भूतोडी बंदर येथील बोट मालकीणीवर खलाशाने ब्लेडने वार केल्याची घटना सोमवारी दुपारी सुमारास घडली. पोलिसांनी आरोपी खलाशाला अटक केली आहे.
भूतोडी बंदर येथील मच्छिमार ब्लेस पांड्या (३५) यांची सेंट ब्लेस ही मासेमारी बोट आहे. त्यावर काही परप्रांतीय खलाशी अनेक महिन्यांपासून काम करत आहेत. नेहमीप्रमाणे ब्लेस यांनी सोमवारी सकाळच्या सुमारास खलाशांना बोटीवर जाण्यास सांगितले. त्यातील सुनील (२५) हा खलाशी बोटीवर न जाता इतरत्र गेला. तो दारु पिऊन दुपारी एकच्या सुमारास ब्लेस यांच्या घरात शिरला. घरातील तळमजल्यावरील खोलीत ब्लेस यांचा सहा वर्षाचा मुलगा झोपला होता. सुनीलने त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला असता मुलाला जाग आली. त्यातच खोलीचा दरवाजा बंद असल्याने घरात असलेली त्याची आई व ब्लेस यांच्या पत्नी फ्रान्सिना यांनी मुलगा झोपल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यामुळे त्या दार न ठोठावता त्या वरील मजल्यावर निघून गेल्या. तेवढ्यात मुलाने सुनीलच्या हातातून सुटका करुन घेत आईकडे धाव घेतली. त्याने आईला सुनीलने केलेला प्रकार सांगितला. त्यावर फ्रान्सिना यांनी मुलाला आजोबांना बोलविण्यास सांगितले. तेवढ्यात सुनीलने त्याच्याकडे असलेल्या ब्लेडने फ्रान्सिना यांच्या गळ्यासह हातांवर सुमारे ७ ते ८ वार केले. तसेच आजोबांना बोलविण्यास जात असलेल्या मुलालाही मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, फ्रान्सिना यांनी प्रसंगावधान राखत सुनीलला पकडले. त्यामुळे मुलगा बचावला.
फ्रान्सिना यांनी आरडाओरड केल्याने शेजारील लोकांनी पांड्या यांच्या घराकडे धाव घेतली. नागरिकांनी सुनीलला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Boat ownership is made by sailors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.