पालिकेने उपलब्ध केली ८१ रूग्णवाहिकांची सुविधा, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली रूग्णवाहिकांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 03:23 PM2020-05-29T15:23:30+5:302020-05-29T15:26:01+5:30

कोरोना बाधीत रुग्णांसाठी अ‍ॅम्ब्युलेन्स मिळत नसल्याची ओरड मागील काही दिवसापासून सुरु होती. परंतु आता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या माध्मातून ८१ अ‍ॅम्ब्युलेन्स उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

BMC provides 81 ambulance facilities, Guardian Minister Eknath Shinde inspects ambulances | पालिकेने उपलब्ध केली ८१ रूग्णवाहिकांची सुविधा, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली रूग्णवाहिकांची पाहणी

पालिकेने उपलब्ध केली ८१ रूग्णवाहिकांची सुविधा, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली रूग्णवाहिकांची पाहणी

Next

ठाणे : कोरोना कोव्हीडचे संकट वाढत असताना रूग्णालयांमध्ये, क्वारंटाईन सेंटर्स आणि आयोसोलेशन सेंटर्समध्ये नेण्यासाठी रूग्णांची गैरसोय होत होती. तसेच अ‍ॅम्ब्युलेन्स नसल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. अखेर आता महाापलिकेने ८१ अ‍ॅम्ब्युलेन्स उपलब्ध करुन दिल्या आहेत. या रुग्णवाहीकांचा पाहणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासमवेत महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त विजय सिंघल आदी उपस्थित होते.
           सुरूवातीच्या काळात रूग्णवाहिकांमुळे नागरिकांची गैरसोय झाल्याच्या पाशर््वभूमीवर शिंदे यांनी त्वरीत मोठ्या प्रमाणात रूग्णवाहिका भाड्याने घेण्याच्या सूचना पालिका प्रशासनास दिल्या होत्या. त्यानंतर महापालिका प्रशासनाने युद्ध पातळीवर जवळपास ८१ रूग्णवाहिका उपलब्ध करून घेतल्या आणि त्यांचे नियोजन करण्यासाठी २४ तास स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला. महापालिकेच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या या रूगणवाहिकांमध्ये महापालिकेच्या ३ कार्डियाक, २ खासगी कार्डियाक रूग्णवाहिका आहेत. तसेच १४ परिवहन बस रूग्णवाहिका, १५ खासगी शाळा बस रूग्णवाहिका, रूग्णवाहिकेमध्ये रूपांतरित केलेली २० वाहने आणि ११ खासगी रूग्णवाहिकांचा समावेश आहे. तथापि रूग्णवाहिकांची ही संख्या १०० पर्यंत वाढविण्याच्या सूचना यावेळी शिंदे यांनी केल्या.

 

Web Title: BMC provides 81 ambulance facilities, Guardian Minister Eknath Shinde inspects ambulances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.