शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदान शिबिरे जिल्हा रुग्णालयातील गोरगरीब रुग्णांसाठी ठरताहेत संजीवनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 00:53 IST

श्रेष्ठदानांपैकी एक दान समजल्या जाणाऱ्या रक्तदानासाठी रक्तदात्यांची संख्या ठाण्यात वाढत आहे.

पंकज रोडेकर ठाणे : श्रेष्ठदानांपैकी एक दान समजल्या जाणाऱ्या रक्तदानासाठी रक्तदात्यांची संख्या ठाण्यात वाढत आहे. मागील तीन वर्षांत रक्तदान शिबिरांची संख्या वाढल्याने ब्लडबॅगांची संख्याही वाढू लागली आहे. या वाढत्या ब्लडबॅगांमुळे ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताची कमतरता भासत नाही. शिबिरांतून संकलित होणाºया रक्ताचा पुरेपूर वापर होत असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली. २०१९ मध्ये पाच हजार १३ ब्लडबॅगा रुग्णांसाठी वापरण्यात आल्या. प्रसूतीसाठी आलेल्या महिलांसह अपघातांत गंभीररीत्या जखमी होणाºया रुग्णांसाठी हे रक्त सर्वाधिक उपयुक्त ठरत असल्याचे ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.ठाणे जिल्ह्यात २०१९ मध्ये आयोजित केलेल्या ७२ शिबिरांमध्ये चार हजार ३५९ ब्लडबॅगा जमा झाल्या. या बॅगांचा पुरेपूर वापर व्हावा, यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून सर्वतोपरी लक्ष दिले गेले. साधारणत: एका बॅगेच्या तीन बॅगा तयार होतात. हे रक्त रुग्णालयातील गोरगरीब रुग्णांनाच उपयुक्त ठरत आहे. प्रसूतीदरम्यानच्या रुग्ण महिला आणि अपघातांत गंभीररीत्या जखमी होणाºया रुग्णांसाठी या रक्ताचा मुख्यत्वे वापर केला जातो. रुग्णाला शासनाने निश्चित करून दिलेल्या दरानुसार रक्त उपलब्ध करून दिले जाते. रुग्णालयाबाहेरील २० टक्के रुग्णांना यानुसार रक्त उपलब्ध करून दिले आहे. रक्तदाता किंवा त्यांचे नातेवाईक अथवा मित्र मंडळींना गरज पडल्यास वर्षातून एक रक्तबॅग मोफत देण्यात येत असल्याची माहिती रुग्णालयाने दिली.२०१७ मध्ये झालेल्या ६६ ब्लडकॅम्पमध्ये चार हजार ३५ ब्लडबॅगा जमा झाल्या होत्या. चार हजार ३०७ रुग्णांसाठी हे रक्त गरजेनुसार वापरण्यात आले.>२०१८ मध्ये ठाणे जिल्ह्यात ६९ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यातून रक्ताच्या चार हजार १४८ बॅग जमा झाल्या होत्या. त्या रक्ताचा वापर चार हजार ६७० रुग्णांसाठी झाला. २०१९ मध्ये रक्तदान शिबिरांचे प्रमाण काहिसे वाढले. त्यामुळे साहजिकच ब्लडबॅगा जमा होण्याचे प्रमाणही वाढले. त्यामुळे २0१९ मध्ये पाच हजार १३ रुग्णांसाठी रक्त उपलब्ध होऊ शकल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.