रविवारी ठाण्यात रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:33 IST2021-07-25T04:33:43+5:302021-07-25T04:33:43+5:30

ठाणे : ‘लोकमत’च्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या रक्तदान महायज्ञामध्ये रविवारी ठाणे शहर काँग्रेस व अय्यपा भक्त सेवा ...

Blood donation camp in Thane on Sunday | रविवारी ठाण्यात रक्तदान शिबिर

रविवारी ठाण्यात रक्तदान शिबिर

ठाणे : ‘लोकमत’च्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या रक्तदान महायज्ञामध्ये रविवारी ठाणे शहर काँग्रेस व अय्यपा भक्त सेवा संघम् यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. वर्तकनगर येथील अय्यप्पा भक्त सेवा समितीच्या हॉलमध्ये ते घेण्यात येणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे, त्याच अनुषंगाने ‘लोकमत’च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे शहर काँग्रेस व अय्यप्पा भक्त सेवा संघम् यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जुलै रोजी सकाळी १० ते ४ वाजेदरम्यान हे रक्तदान शिबिर आयोजिले आहे. या शिबिरात प्रामुख्याने ‘देवमाणूस’ या मराठी सिरीयलमधील अभिनेत्री सोनाली पाटील व प्रसिद्ध ‘हास्यजत्रा’फेम समीर चौगुले उपस्थित राहणार आहेत. तरी याप्रसंगी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Blood donation camp in Thane on Sunday