रक्त तुटवड्यावर मात करण्यासाठी आव्हाड यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:36 IST2021-04-03T04:36:56+5:302021-04-03T04:36:56+5:30
ठाणे : सध्या राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. त्यावर मात करण्यासाठी रक्तदानाची नितांत गरज आहे. त्यामुळे राष्ट्रवादी ...

रक्त तुटवड्यावर मात करण्यासाठी आव्हाड यांनी केले रक्तदान
ठाणे : सध्या राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. त्यावर मात करण्यासाठी रक्तदानाची नितांत गरज आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. केवळ आवाहन करून न थांबता त्यांनी शुक्रवारी स्वत: रक्तदान केले.
कोरोनाची दुसरी लाट राज्यात आली असतानाच आता रक्ताचा मोठा तुटवडाही निर्माण झाला आहे. सध्या पुढील आठ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन आव्हाड यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी स्वत: शुक्रवारी दुपारी खोपट येथील ब्लडलाइन रक्तपेढीत रक्तदान केले. यावेळी रक्तपेढीचे डॉ. पाटील हेही उपस्थित होते.
यावेळी आव्हाड म्हणाले, ‘राज्यातील रक्ततुटवड्याची समस्या पाहता कोणी तरी रक्ताअभावी तडफडून मरतोय, हे महाराष्ट्राला भूषणावह नाही. त्यामुळे तरुण-तरुणींनी कोविडला न घाबरता फिजिकल डिस्टन्सिंगचा अवलंब करून रक्तदान करावे. तसेच कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंगसह मास्कचा वापर करावा.’
--------------