इंधन दरवाढीविरोधात खारबाव येथे राष्ट्रवादीचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:49 IST2021-07-07T04:49:53+5:302021-07-07T04:49:53+5:30

भिवंडी : काही दिवसांपासून केंद्र शासनाकडून दररोज इंधन दरवाढ सुरू आहे. त्यामुळे महागाईच्या खाईत लाेटलेल्या सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. ...

Block NCP's road at Kharbao against fuel price hike | इंधन दरवाढीविरोधात खारबाव येथे राष्ट्रवादीचा रास्ता रोको

इंधन दरवाढीविरोधात खारबाव येथे राष्ट्रवादीचा रास्ता रोको

भिवंडी : काही दिवसांपासून केंद्र शासनाकडून दररोज इंधन दरवाढ सुरू आहे. त्यामुळे महागाईच्या खाईत लाेटलेल्या सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या धाेरणाविराेधात सोमवारी भिवंडी तालुक्यातील खारबाव येथे भिवंडी-चिंचोटी-वसई मार्गावर भिवंडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदाेलकांनी केंद्राविराेधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनादरम्यान महामार्गावर काहीवेळ मोठी वाहतूककोंडी झाली होती. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष कमलाकर टावरे, तालुकाध्यक्ष गणेश गुळवी, ठाणे जिल्हा सचिव महेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष देवीदास पाटील, जिल्हा परिषद सदस्य रत्ना तांबडे, जिल्हा उपाध्यक्ष नीतेश पाटील, युवक अध्यक्ष योगेश म्हात्रे, उपसरपंच रेश्मा पाटील इत्यादी राष्ट्रवादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Block NCP's road at Kharbao against fuel price hike